best news portal development company in india

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सला नाईट रायडर्सविरुद्ध देखील नामुष्कीजनक पराभवाचा सामना

SHARE:

 

यंदाच्या हंगामात अतिशय खराब फॉर्मशी झुंजत असलेल्या Hardik Pandya हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सला येथे कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध देखील नामुष्कीजनक पराभवाचा सामना करावा लागला. पावसाने व्यत्यय आलेल्या या सामन्यात मुंबईला २० षटकांत ८ बाद १४७ अशा माफक धावसंख्येवर रोखल्यानंतर केकेआरने विजयाचे लक्ष्य १८.५ षटकांत ४ गडी राखून सहजरीत्या पार केले.विजयासाठी १४८ धावांचे आव्हान असताना केकेआरतर्फे मनीष पांडेने सर्वाधिक ४५ तर रोव्हमन पॉवेलने ४० धावांचे योगदान दिले.

Captain Ajinkya Rahane कर्णधार अजिंक्य रहाणेने २१ धावा जोडल्या. आघाडी फळीतील अन्य फलंदाज ठरावीक अंतराने बाद होत असले तरी माफक लक्ष्य असल्याने केकेआरने विजयाची संधी अजिबात दवडली नाही.येथील अत्यंत महत्त्वाच्या लढतीत कोलकाता नाईट रायडर्सच्या गोलंदाजांनी ईडन गार्डन्सच्या संथ परिस्थितीचा अचूक फायदा उठवला. त्यांनी शिस्तबद्ध गोलंदाजीच्या जोरावर Mumbai Indians मुंबई इंडियन्सला ८ बाद १४७ धावांवर रोखले. सामन्यापूर्वी खेळपट्टी बराच वेळ झाकून ठेवण्यात आली होती. या खेळपट्टीवर ढगाळ वातावरणात कोलकाताने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कॅमेरून ग्रीन आणि डावखुरा वेगवान गोलंदाज सौरभ दुबे  Saurabh Dubey यांनी सुरुवातीला प्रत्येकी दोन बळी घेतले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत नव्या चेहर्‍यांना संधी मिळण्याची शक्यता

चार वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असलेली ही जोडी लवकरच लग्न करेल

Leave a Comment

best news portal development company in india
और देखें