best news portal development company in india

पालकांनी मुलांना चुन्याच्या पुड्यांपासून दूर ठेवावे- डॉ.शोन चिंचोले

SHARE:

बुलढाणा न्यूज

अनेक वेळा तंबाखू घेणारे ग्राहक या चुन्याच्या पुड्या वापरत नाही. परिणामी दुकानदारांकडे या पुड्यांचा साठा उरतो आणि काही ठिकाणी त्या रस्त्यावर किंवा दुकानाबाहेर फेकून दिल्या जातात. यामुळे हाच निष्काळजीपणा लहान मुलांच्या डोळ्यांसाठी मोठा धोका ठरतो.

लहान मुलांनी खेळ म्हणून फोडलेली चुनापुडी फुटली की चुना डोळ्यात जाऊन कायम स्वरुपी दृष्टीदोष, अंधत्व व अनेक समस्यां उद्भवत आहे. सध्या ही समस्या सार्वत्रिक दिसत असून नेत्रतज्ञांनी गंभीर इशारा दिला आहे. हवाबंद पुड्यांमध्ये दाब (प्रेशर) असल्यामुळे लहान मुले त्या चप्पलने दाबून, दगडाने ठेचून किंवा फटाक्यासारख्या आवाजासाठी फोडतात. पुडी फुटताच त्यातील चुना हवेत उडून थेट डोळ्यांमध्ये जातो. चेहर्‍याजवळ असल्यामुळे सर्वाधिक परिणाम डोळ्यांवर होतो. चुना डोळ्यात गेल्यानंतर तीव्र जळजळ, लालसरपणा, पाणी येणे, डोळा न उघडता येणे, असह्य वेदना अशा तक्रारी त्वरित सुरू होतात. या कारणामुळे पालकांनी मुलांना चुन्याच्या पुड्यांपासून दून ठेवावे असे आवाहन डॉ.शोन चिंचोले यांनी केले आहे.

काही वेळा इजा सौम्य असते, तर काही वेळा ती अत्यंत गंभीर स्वरूपाची असते. म्हणून सर्व दुकानदार, व्यावसायिक आणि नागरिकांनी मुलांना सूचना देऊन जागरूक करावे. उरलेल्या चुन्याच्या पुड्या रस्त्यावर किंवा उघड्या जागेत फेकू नयेत. त्या सुरक्षितरीत्या नष्ट कराव्यात. तसेच पालकांनी मुलांना अशा पुड्यांपासून दूर ठेवावे. लहान मुले घाबरून डोळे चोळतात, त्यामुळे इजा आणखी वाढते. चुना डोळ्याच्या आतील भागात जाऊन कंजंक्टिव्हा व बुबुळावर (कॉर्निया) गंभीर घर्षण निर्माण करतो. रासायनिक प्रतिक्रिया होऊन कॉर्नियावर जखम, पांढरे डाग किंवा अल्सर तयार होऊ शकतात. काही प्रकरणांमध्ये ही इजा कायमस्वरूपी राहून दृष्टी कमी होण्याचा किंवा अंधत्वाचा धोका उद्भवत आहे.

आमदार श्वेता महाले यांना मनोज लाहूडकरचे आवाहन

बुलढाणा जिल्ह्यातील पहिल्या महिला मानद वन्यजीव रक्षक म्हणून डॉ.वैशाली निकम ह्यांची निवड व सन्मान

Leave a Comment

best news portal development company in india
और देखें