तीन सदस्य अविरोध
बुलढाणा न्यूज- बुलढाणा तालुक्यातील गट ग्रामपंचायत घाटनांद्रा ग्रामपंचायत सरपंच पदी अनुराधा गणेश भुसारी यांचा 825 मते घेऊन विजयी झाल्या आहेत.ती ढासाळवाडी येथील शेषराव पंजाबराव शेवाळे, किरण विनोद अंभोरे, पल्लवी सुजय रिंढे हे तीन सदस्य अविरोध निवडून आले होते.
घाटनांद्रा येथील गणेश उत्तम कन्नर हे विजयी झाले असून त्यांना 264 मते मिळाली. लक्ष्मी योगेश गायकवाड हे विजयी झाले असून त्यांना 353 मते मिळाली आहेत. तर उषा धीरज राव या विजय झाल्या असून त्यांना 325 मते मिळाली राहुल अशोक माळी हे विजयी झाले असून त्यांना 375 मते मिळाली. सतीश संतोष नरोटे हे विजय झाले असून त्यांना 350 मते मिळाली. अफरीन परविन शेख जावेद या विजयी झाल्या असून त्यांना 409 मते मिळाली आहेत. घाटनांद्रा गट ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायत मध्ये एकूण नऊ सदस्य आहेत. त्यापैकी ढासाळवाडी येथील तीन सदस्य अविरोध निवडून आले होते. तर सदस्यसाठी निवडणूक झाली होती त्यासाठी सदस्य पदासाठी तेरा उमेदवार उभे राहिले होते तसेच सरपंच पदासाठी पाच उमेदवार उभे राहिले होते.