बुलढाणा न्यूज – जिल्ह्यातील मराठा समाजास कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्यासाठी सन 1967 पूर्वीचे कुणबी नोंदी पुरावे संबधित उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर करा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी केले आहे.
कुणबी संदर्भातील निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक, महसूली पुरावे, संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्ताऐवज इत्यादी पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करून पात्र व्यक्तीना कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी सर्व उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांना दिले आहे. मराठा-कुणबी, कुणबी-मराठा अथवा कुणबी याबाबतचे सन 1967 पूर्वीचे कुणबी नोंदी पुरावे उपलब्ध असतील अशा विध्यार्थी, नागरिकांनी संबंधीत उपविभागीय अधिकारी व तहसिल कार्यालयाकडे जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी पुराव्यासह अर्ज सादर करावेत.