48 ग्रामपंचायतीसाठी साडे नऊ वाजेपर्यंत झाले केवळ 11.20 टक्के मतदान Only 11.20 percent polling took place till half past nine for 48 Gram Panchayats
बुलढाणा न्यूज – बुलढाणा जिल्हयातील 13 तालुक्यामध्ये एकूण ग्रामपंचायतीपैकी 48 सार्वत्रिक व 10 पोट निवडणूंकासाठी आज रविवार, दि.5 नोव्हेंबर 2023 रोजी मतदान केंद्रावर सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 11.20 टक्के मतदान झाले आहे.
यामध्ये चिखली तालुक्यातील एक ग्रामपंचायत साठी एकूण 1 हजार 26 मतदान असून यामध्ये एकूण 56, मेहकर तालुक्यातील चार ग्रामपंचायती एकूण मतदान 1 हजार 462 मतदान असून यापैकी 206 मतदान झाले आहे. तर खामगाव तालुक्यातील 1 ग्रामपंचायतीकरीता एकूण 262 मतदान असून यापैकी 31 मतदान झाले आहे. तर संग्रामपूर तालुक्यातील दोन ग्रामपंचायती एकूण 785 मतदान असून यापैकी 109 मतदान झाले आहे. तर नांदुरा तालुक्यातील 2 ग्रामपंचायतीकरीता एकूण 750 असून त्यापैकी 78 मतदान झाले आहे. ही सर्व आकडेवारी आज दि.5 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 7.30 ते सकाळी 9.30 वाजेपर्यत ची असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाचे नायब तहसिलदार संजय बनगाडे यांनी दिली आहे.
सन 2021, 2022 व 2023 नुकसानीची भरपाई रक्कम तुमच्या खात्यात जमा झाली का?