ग्रंथालयांना अर्थसहाय्य पाहिजे का ? 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करा Should Libraries Be Funded? Apply by November 30

Should Libraries Be Funded? Apply by November 30

          बुलढाणा न्यूज www.buldhananews.com– राजा राम मोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान यांच्याकडून शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजना ग्रंथालय संचालनालयामार्फत राबविण्यात येते. त्यानुसार यावर्षीसाठी ग्रंथालयांनी गुरुवार, दि.30 नोव्हेंबर 2023 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

             सन 2023-24 वर्षासाठी विविध समान व असमान निधी योजनांचा लाभ घेण्यासाठी राज्यातील शासनमान्य ग्रंथालयांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. त्या संदर्भांतील नियम, अटी व अर्जाचा नमुना www.rrlf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुक ग्रंथालयांनी अर्जाचा नमुना संकेतस्थळावरुन उपलब्ध करुन घ्यावा.

         समान निधी योजनांमध्ये इमारत बांधकाम व विस्तार अर्थसहाय्य योजना (रु. 25 लक्ष रुपये), वरील योजनेच्या व्यतिरिक्त समान निधी योजनेंतर्गत इतर योजनांचा लाभ केंद्रीय पद्धतीने देण्यात येत असल्यामुळे इतर योजनेसाठीचे प्रस्ताव सादर करु नयेत.

          असमान निधी योजनेत ग्रंथालय सेवा देणार्‍या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधन सामग्री, फर्निचर, इमारत बांधकाम व विस्तारासाठी अर्थसहाय्य(फर्निचर खरेदी 4 लक्ष रुपये व इमारत बांधकाम 10 ते 15 लक्ष रुपये). राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान ज्ञान कोपरा  विकसित करण्यासाठी अर्थसहाय्य (2 लक्ष 50 हजार रुपये) व विशेष अर्थसहाय्य आधुनिकीकरण (2 लक्ष). महोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी अर्थसहाय्य(6 लक्ष 20 हजार व इमारत विस्तारासाठी 10 लक्ष). राष्ट्रस्तरीय चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग व जागरुकता कार्यक्रम आयोजनासाठी अर्थसहाय्य( 1 ते 3 लक्ष रुपये), बाल ग्रंथालय व राजा राममोहन रॉय ग्रंथालय बाल कोपरा स्थापन करण्याकरीता अर्थसहाय्य (6 लक्ष 80 हजार) देण्यात येते.

         योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी  www.rrlf.gov.in  या संकेतस्थळावरून माहिती घ्यावी. आवश्यकता असल्यास जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. ग्रंथालयांनी वरीलपैकी कोणत्याही एका योजनेसाठीचा प्रस्ताव विहित मार्गाने व मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह इंग्रजी, हिंदी भाषेत चार प्रतीत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास दि. 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठवावेत, असे आवाहन ग्रंथालय संचालक दत्तात्रेय क्षीरसागर यांनी केले आहे.

सन 2021, 2022 व 2023 नुकसानीची भरपाई रक्कम तुमच्या खात्यात जमा झाली का?

मंगळवारी ऑनलाईन प्लेसमेंन्ट ड्राईव्ह; रोजगारांची सुवर्ण संधी – Online Placement Drive on Tuesday; Golden opportunity of employment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें