मंगळवारी ऑनलाईन प्लेसमेंन्ट ड्राईव्ह; रोजगारांची सुवर्ण संधी – Online Placement Drive on Tuesday; Golden opportunity of employment

Online Placement Drive on Tuesday; Golden opportunity of employment

                बुलढाणा न्यूज – जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करीअर सेंटर यांच्याव्दारे ऑनलाईन प्लेसमेंन्ट ड्राईव्हचे आयोजन मंगळवार दि. 7 नोव्हेंबर रोजी करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्र. वा. खंडारे यांनी केले आहे.

          रोजगार मेळाव्यामध्ये पीपल ट्री, व्हेंचर, धुत ट्रान्समिशन या नामांकित कंपनीने रोजगार मेळाव्यासाठी पदे अधिसुचित केलेली आहे. कार्यालयाकडे नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्याद्वारे संबधित कंपनी प्रतिनिधीद्वारे गरजु व रोजगार इच्छुक उमेदवारांच्या ऑनलाईन मुलाखती घेण्यात येवुन त्यांची प्राथमिक निवड करण्यात येणार आहे. यासोबतच बुलढाणा जिल्ह्यातील उमेदवारांना कौशल्य विकास प्रशिक्षणाची संधी सुध्दा नि:शुल्क उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

        कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्य www.ncs.gov.in  या संकेतस्थळावर नाव नोंदणी केलेल्या दहावी आणि बारावी पास पुरुष, महिला उमेदवारांनी आपले सेवासोजन कार्डचा आयडी व पासवर्डचा वापर करुन आपले लॉगइन मधुन ऑनलाईन अर्ज अप्लाय करुन सहभागी व्हावी. या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याकरीता कार्यालयात येण्याची गरज नाही. उमेदवार जेथे असतील त्याच ठिकाणावरुन आपल्या सेवायोजन कार्डचा युझर आयडी व पासवर्डचा वापर करुन आपल्या लॉगइन मधुन ऑनलाईन रोजगार मेळाव्यात ऑनलाईन पध्दतीने सहभागी होऊ शकतात.

शैक्षणीक पात्रतेच्या आधारे एकापेक्षा जास्त पदांकरीता सुध्दा अर्ज करु शकतात

         पात्र गरजु व नौकरी इच्छुक स्त्री-पुरुष उमेदवार आपल्या शैक्षणीक पात्रतेच्या आधारे एकापेक्षा जास्त पदांकरीता सुध्दा अर्ज करु शकतात. आपल्या सेवायोजन कार्डच्या युझर आयडी आणि पासवर्ड वापर करुन आपले लॉगइन मधुन ऑनलाईन अर्ज करावा. ऑनलाईन अर्ज करताना काही अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, तथा मॉडेल करियर सेंटर बुलढाणा या कार्यालयाशी प्रत्यश संपर्क साधावा. तसेच या कार्यालयाच्या 07262-242342 दूरध्वनी क्रमांकावर आणि भ्रमणध्वनी क्रमाकावर 7447473585 संपर्क साधावा.

 

मोकाट कुत्र्यांच्या टोळीचा रोहीच्या पिल्लावर हल्ला

सन 2021, 2022 व 2023 नुकसानीची भरपाई रक्कम तुमच्या खात्यात जमा झाली का?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें