इंडियन रेड क्रॉस सोसायटीची 10 नोव्हेंबरला बैठकीचे आयोजन Indian Red Cross Society to organize meeting on 10th November

इंडियन रेड क्रॉस सोसायटीची 10 नोव्हेंबरला बैठकीचे आयोजन 

Indian Red Cross Society to organize meeting on 10th November

1920 अंतर्गत रेड क्रॉस सोसायटी संपूर्ण भारतात कार्यरत

           बुलढाणा – इंडियन रेड क्रॉस सोसायटी कायदा 1920 अंतर्गत रेड क्रॉस सोसायटी संपूर्ण भारतात कार्यरत आहे. ही सोसायटी राज्य व जिल्हास्तरीय शाखेच्या माध्यमातून विविध समाज उपयोगी कामातुन आपले सामाजिक दायित्व पूर्ण करत असतात. राज्यपाल यांच्या सुचनेनुसार बुलढाणा जिल्हास्तरावर समिती गठीत करण्यात येत आहे.

          इंडियन रेड क्रॉस सोसायटीची जिल्हास्तरीय शाखा गठीत करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक क्षेत्रात निस्वार्थ सेवा करणार्‍या नागरिकांनी जिल्हाधिकारी यांच्या दालनात शुक्रवार, दि. 10 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

           सामाजिक क्षेत्रात निस्वार्थपणे सेवा करणार्‍या नागरिकांची समिती गठीत करायची आहे. त्यानुसार इच्छुक नागरिकांनी आपल्या ओळखपत्रासह जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहावे. बैठकीत उपस्थित असलेल्या नागरिकांमधुन जिल्हा कार्यकारणीची प्राथमिक स्वरुपाची निवड करण्यात येईल. त्यानंतर जिल्हा स्तरीय संघटना गठीत करण्यात येईल. समितीमध्ये निवड झालेल्या नागरिकांना स्वखर्चाने इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे सदस्यत्व स्विकारता येईल.

अधिक माहितीसाठी यांच्याशी संपर्क साधावा
डॉ. प्राची तायडे 7798141367,
डॉ. विनोद जवरे 9422325650
रविंद्र लहाने 9422884421
या मोबाईलवर संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें