Camps are organized on the first and third Wednesday of every month
नागरिकांनी शिबिराचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांचे आवाहन
बुलढाणा न्यूज – शासनाव्दारे राबविण्यात येणार्या विविध योजनाचा लाभ नागरिकांना मिळावा यासाठी जिल्हा प्रशासनाव्दारे मंडळ व तालुकास्तरावर शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. तालुकास्तरावर तहसिल कार्यालय येथे तर ग्रामीण भागात प्रत्येक महसुल मंडळ मुख्यालयात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसर्या बुधवारी शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. या शिबिराचा शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
शासनाच्या विविध विभागाव्दारे विविध योजनाचा लाभ शिबिराच्या माध्यमातून देण्यात येत आहे. यामध्ये अंत्योद्य शिधापत्रिका वितरण, सामाजिक अर्थसहाय योजना, प्रधानमंत्री घरकुल योजना, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, ई-श्रम जोडणी, आधार नोंदणी व दुरुस्ती, जातीचे प्रमाणपत्र व इतर प्रमाणपत्राचे वितरण शिबिराम
ध्ये करण्यात येत आहे. शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यासाठी संबधित विभागाव्दारे जिल्हा व तालुकास्तरावर नोडल अधिकार्यांची नेमणुक करण्यात आली आहे. तालुकास्तरावर संबधित सर्व विभागाशी समन्वय ठेवुन शिबिर यशस्वी करण्याची जबाबदारी तहसिलदार व उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आली आहे. तरी संबधित विभागाने आपल्या अधिनस्त विविध योजनाचा लाभ पात्र व गरजवंताना मिळवून द्या, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी संबधित विभागाना दिले आहे.
ऑक्टोबर महिण्यात 4 हजार 732 लाभार्थ्यांनी घेतला लाभ
जिल्हा प्रशासनाव्दारे ग्रामिण व तालुकास्तरावर शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. ऑक्टोबर महिण्यात जिल्ह्यातील 13 तालुक्यात झालेल्या शिबिरामध्ये 4 हजार 732 लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनाचा लाभ देण्यात आला. याम
ध्ये मतदार नोंदणी 406, जातीचे प्रमाणपत्र व दाखल 1651, रेशनकार्ड वितरण 511, संजय गांधी कार्ड वितरण 707, आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती 262, ई-श्रम कार्ड वितरण 51, प्रधानमंत्री घरकुल योजना 292 व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनाचे 852 लाभार्थ्यांना योजनाचा लाभ देण्यात आला.
प्रत्येक महिण्याच्या पहिल्या व तिसर्या बुधवारी ग्रामीण व तालुकास्तरावर घेण्यात येणार्या शिबिरांचे नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पाटील Buldhana Collector Dr. Kiran Patil यांनी केले आहे.