30 नोव्हेबरपर्यंत मुदत, जिल्हा कोषागार अधिकारी ऋषिकेश वाघमारे यांचे आवाहन
The PAN number should be mentioned along with the signature on the life certificate
बुलढाणा न्यूज – राज्य शासनाकडून जिल्ह्यातील सर्व निवृत्ती वेतन धारक, कुटूंब निवृत्ती धारक, माजी आमदार, इतर राज्य निवृत्ती वेतन धारकांनी 30 नोव्हेंबरपर्यंत बँकेमध्ये जावून विहीत नमुन्यातील हयात प्रमाण पत्रावर स्वाक्षरी करावी. तसेच स्वाक्षरीसोबत पॅन क्रमांक नमुद करावा. संबधीत बँकेत विहीत नमुन्यातील हयात प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. याबाबत निवृत्ती वेतन धारकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी ऋषिकेश वाघमारे यांनी केले आहे.
विशेष पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत प्रारूप मतदार यादी आज होणार प्रसिद्ध
महाराष्ट्राच्या पहिल्या अग्निविराच्या कुटुंबाला राज्य शासनातर्फे दहा लाख रुपयांची मदत