विशेष पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत प्रारूप मतदार यादी आज होणार प्रसिद्ध

अडचणींचे निराकरण करण्यासाठी टोल फ्री क्रमांक 1950  Toll free number 1950 वर संपर्क साधावा

      बुलढाणा न्यूज – निवडणूक आयोगाने दि. 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. कार्यक्रमानुसार आज दि. 27 ऑक्टोंबर 2023 रोजी प्रारुप मतदार यादी सर्व पदनिर्देशित ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. पुनरिक्षण

कार्यक्रमाअंतर्गत दि. 27 ऑक्टोबर ते 9 डिसेंबर 2023 या कालावधीत सर्व विधानसभा मतदार संघ व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यास्तरावर दावे व हरकती स्विकारण्यात येणार आहेत. प्राप्त दावे व हरकती निकालात काढून दि. 5 जानेवारी 2024 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येईल, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुहासिनी गोणेवार यांनी दिली आहे.
               प्रारुप मतदार यादीमध्ये आपले नाव समाविष्ट आहे किंवा नाही याची मतदारांनी खात्री करुन घ्यावी. प्रारुप मतदार यादीमध्ये ज्या मतदारांची नावे आढळून आलेली नाही. तसेच दि. 1 जानेवारी 2024 रोजी ज्याचे वय 18 वर्ष पुर्ण होईल, अशा नागरीकांनी दावे व हरकती स्विकारण्याच्या कालावधीत मतदार यादीमध्ये आपले नाव असल्याची खात्री करावी. नाव समाविष्ठ करणे, दुरुस्ती करणे, अस्पष्ट, चुकीचा फोटो, वय, पत्ता, नाव इत्यादी प्रकारची कामे या कालावधीत होणार आहे. नागरीकांना मतदार नोंदणीसंदर्भात येणार्‍या अडचणींचे निराकरण करण्यासाठीToll free number 1950 टोल फ्री क्रमांक 1950 वर संपर्क साधावा. जिल्ह्यातील सर्व नागरीक व नवमतदारांनी या कालावधीत मतदार नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

गड किल्ले भाड्याने देण्याचा निर्णय अत्यंत घातक या निर्णयाला विरोध करु : मनसेचे नेते अमोल रिंढे

राहुल गांधी यांचे प्रतिनिधी म्हणून माजी सैनिक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष कर्नल रोहीत चौधरी आज घेणार अग्निवीर अक्षय यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचे 89 वर्षी निधन (Senior Kirtanist Baba Maharaj Satarkar Died at 89)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें