अग्निवीर अक्षय गवते कुटूंबियांचे माजी सैनिक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष कर्नल रोहित चौधरी यांच्याकडून सांत्वन

राष्ट्रीय कॉग्रेसचे राहुल गांधी Rahul Gandhi यांचे प्रतिनिधी म्हणून आले होते कर्नल रोहित चौधरी Colonel Rohit Chaudhary

             बुलढाणा न्यूज www.buldhananews.com – बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सराई येथील शहीद अग्निवीर अक्षय गवते  Agnivir Akshaya Gavte यांच्या कुटुंबाची आज गुरुवार, दि.26 ऑक्टोंबर रोजी राष्ट्रीय अध्यक्ष माजी सैनिक विभाग नवी दिल्लीचे कर्नल रोहित चौधरी यांनी पिंपळगाव सराई येवून गवते कुटूंबियांची भेट घेतली. आज गुरुवार, 26 ऑक्टोंबर रोजी अग्निवीर अक्षय गवते यांच्या रक्षा विसर्जनाच्या कार्यक्रम असल्याने कर्नल रोहित चौधरी यांनी गवते कुटूंबियांची भेट घेतली आहे.
यावेळी अक्षय यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. तसेच अक्षय गवते यांच्या आई वडिलांचे तसेच गवते कुटुंबाचे सांत्वन केले.

       

           यावेळी कर्नल चौधरी म्हणाले की, सैनिक हा कोणत्या गावाचा, कोणत्या राज्याचा किंवा कोणत्या धर्माचा नसतो. तो देशासाठी शहीद झालेला असतो. कर्नल चौधरी हे कॉग्रेसचे राहुल गांधी यांचे प्रतिनिधी म्हणून गवते कुटुंबाचे सांत्वना करीता आले होते. याप्रसंगी बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी शहीद जवान अग्नवीर अक्षय गवते यांच्या कुटुंबाला केंद्र शासनाकडून व राज्य शासनाकडून त्वरित मदत करावी. यासोबतच प्रत्येक अग्निविराला सैनिकाप्रमाणे शासकीय मान सन्मान द्यावा. गवते कुटुंबाला शासकीय मदत मिळवून देण्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल असे देखील राहुल बोंद्रे यांनी गवते कुटुंबीयांना आश्वासन दिले.

                 यावेळी राष्ट्रीय कॉग्रेसचे नागपूर समन्वय प्रतिनिधी संदेश सिंगलकर, शिक्षक पदवीधर आमदार धीरज लिंगाडे, माजी मंत्री राजेंद्र शिंगणे, उबाठ शिवसेना गटाचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, कॉग्रेसचे प्रदेश सचिव हाजी दादू शेठ, धाडचे माजी सरपंच रिजवान सौदागर, डॉ.देवकर,माजी पंचायत समिती सदस्य किशोर साखरे, चांद मुजावर यांची उपस्थिती होती.

ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचे 89 वर्षी निधन (Senior Kirtanist Baba Maharaj Satarkar Died at 89)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें