राहुल गांधी यांचे प्रतिनिधी म्हणून माजी सैनिक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष कर्नल रोहीत चौधरी आज घेणार अग्निवीर अक्षय यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

बुलढाणा न्यूज www.buldhananews.com– अखिल भारतीय काँग्रेस कमिटी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे प्रतिनिधी म्हणून अखिल भारतीय काँग्रेस कमिटी माजी सैनिक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष कर्नल रोहीत चौधरी National President of Ex-Servicemen’s Section Colonel Rohit Choudharyहे आज गुरुवार, 26 ऑक्टोबर 2023 रोजी पिंपळगाव सराई येथील अग्निवीर दिवंगत अक्षय गवते यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेणार आहेत. यावेळी दिवंगत अक्षय गवते यांचे अभिवादन करतील.

        तालुक्यातील पिंपळगाव सराई येथील वीर जवान अक्षय लक्ष्मण गवते यांना सियाचीन ग्लेशिअरमध्ये कर्तव्यावर असताना वीरमरण आले. शुक्रवार, दि.20 ऑक्टोबर 2023 रोजीच्या रात्री 11 वाजून 35 मिनिटांनी रुग्णालयात त्यांना हृदयविकाराचा झटका आला. अक्षय यांच्यावर 23 ऑक्टोबरला सकाळी जन्मगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी व काँग्रेस अध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खर्गे यांनी ट्विटरवर श्रद्धांजली अर्पण करत अग्निवीरांच्या विविध समस्यांवर केंद्रातील सरकारला प्रश्न विचारले होते. यानंतर आज गुुरुवार, 26 ऑक्टोबर रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटी माजी सैनिक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष कर्नल रोहीत चौधरी हे अग्निवीर अक्षय गवते यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देणार आहेत. यानंतर ते दुपारी दिड वाजेच्या सुमारास माजी सैनिकांशी संवाद साधणार आहेत. यानंतर दुपारी तीन वाजेच्या सुमारास संभाजी नगर कडे रवाना होणार आहेत. यानंतर सायंकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास संभाजी नगर येथून दिल्ली करीता रवाना होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें