ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचे 89 वर्षी निधन (Senior Kirtanist Baba Maharaj Satarkar Died at 89)

नेरुळ येथे होणार अत्यसंस्कार

       बुलढाणा न्यूज –  ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर (Senior Kirtanist Baba Maharaj Satarkar) उर्फ निळकंठ ज्ञानेश्वर गोरे यांचे 89 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्यावर शनिवार, 28 ऑक्टोंबर 2023 रोजी नेरुळ येथे अत्यंसंस्कार होणार आहेत.
            बाबा महाराज सातारकर यांचे खरं नाव निळकंठ ज्ञानेश्वर गोरे असे होते. त्यांचा जन्म दिवस हा दि.5 फेब्रुवारी 1936 रोजी झाला असून बाबा महाराज सातारकर बाबा महाराज सातारकर हे वयाच्या आठव्या वर्षापासून कीर्तनातील अभंग चालीवर म्हणायचे. तेव्हा पासूनच त्यांना गायन व कीर्तनाचा छंद असल्याचे बोलले जात आहे. बाबा महाराज सातारकर यांनी वयाच्या अकराव्या वर्षापासूनच पुरोहित बुवा तसेच आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खॉ साहेब यांच्या कडून शास्त्रीय गायनाचे धडे गिरविण्यास प्रारंभ केला होता.यांचे शिक्षण हे इंग्रजी माध्यमातून एसएससी पर्यत झाले होते.                      सातारकरांचे वडील ज्ञानेश्वर दादा महाराज गोरे हे सुध्दा चांगले मृदुंग वाजवित असत. बाबा महाराज सातारकर यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर गोरे  (Baba Maharaj Satarkar’s mother’s name was Lakshmibai Dnyaneshwar Gore)होते.  बाबा महाराज यांनी मध्यंतरीच्या कालावधीत फर्निचरचा व्यवसाय सुरु केला होता परंतु काही कालावधीत नंतर त्यांनी तो व्यवसाय बंद केला होता. ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांच्या पत्नीचे नाव रुक्मिनी सातारकर असे होते त्यांचे वयाच्या 85 वर्षी निधन झाले होते.त्यांनी बाबा महाराज सातारकर यांना धार्मिक कार्यात मोलाचे सहकार्य केले होते हे विशेष!

राहुल गांधी यांचे प्रतिनिधी म्हणून माजी सैनिक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष कर्नल रोहीत चौधरी आज घेणार अग्निवीर अक्षय यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें