The decision to rent the forts is very dangerous Will oppose this decision: MNS leader Amol Rindhe
बुलढाणा न्यूज www.buldhananews.com – महाराष्ट्र सरकारने गड किल्ले भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय अत्यंत घातक असून इतिहासाची बेइमानी असून ही बेइमानी खपवून घेणार नाही तसेच शिवप्रेमींना सोबत घेवून आम्ही मनसेच्या वतीने या निर्णयाला विरोध करु असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अमोल रिंढे पाटील यांनी व्यक्त केले आहे.

याबाबत लवकरच जनआंदोलन उभारण्याचा इशाराही अमोल रिंढे पाटील यांनी दिला आहे. सरकारने प्राचीन गड किल्ले दत्तक देण्याच्या नावाखाली एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला देण्याचा निर्णय घेतला आहे. काही वर्षाकरिता त्या वास्तूची मालकी संबंधित संस्थेला , व्यक्तीला असणार आहे. ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य झाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनित झालेली वास्तू चे पवित्र जर शासन राखू शकत नसेल तर ते गड किल्ले समारंभ, पार्ट्या किंवा इतर प्रयोजनासाठी भाड्याने देण्याचा अधिकार प्रशासनाला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी कार्य केले. परंतु त्याच महाराष्ट्रातील सरकार जर त्यांचेच किल्ले समारंभासाठी भाड्याने देत असेल तर याच्यासारखा कृतघनपणा नाही असे मनसेचे बुलढाणा तालुकाध्यक्ष अमोल रिंढे पाटील यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
गड किल्ल्याची डागडूजी करून त्याची संवर्धन करणे गरजेचे आहे. मात्र शासनाजवळ यासाठी पैसा नाही. अशी सबब पुढे केली जात असेल तर याच्यासारखा दुटप्पीपणा नाही. एकीकडे प्रचंड भ्रष्टाचार चालू आहे. मोठमोठी कामे चालू आहेत. उद्योगपतींना लाखोंचे कर्ज माफ केली जात आहेत. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांच्या बाबतीत मात्र उदासिनता दाखवली जात आहे.हा दुटप्पीपणा खपवून घेतल्या जाणार नाही असे अमोल रिंढे पाटील यांनी म्हटले आहे.या बाबत जण आंदोलनाचा ईशारा देण्यात आला आहे.
विशेष पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत प्रारूप मतदार यादी आज होणार प्रसिद्ध
व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तरुणांनी हृदयरोगतज्ञ डॉक्टराचेच ठोके वाढविले