व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तरुणांनी हृदयरोगतज्ञ डॉक्टराचेच ठोके वाढविले

पाच आरोपींना अटक तर तीन आरोपी अद्यापही फरार

Threatening to make the video viral, the youth beat the cardiologist

          बुलढाणा न्यूज www.buldhananews.com– बुलडाणा शहरातील सुंदरखेड भागातील रहिवाशी हृदयरोगतज्ञ डॉक्टरचे आरोपीने अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत साडे आठ लाख रुपयांनी लुबाडले असल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. एवढ्यावरच ह्या आरोपींची पैश्याची भूक भागली नाही. त्यामुळे यातील एका युवकाने अतिउत्साहाच्या भरात डॉक्टरला पैसे मागण्यासाठी घरी गेला व डॉक्टरांना धमकी दिली की, पैसे न दिल्यास तुमच्या कुटुंबांना जिवे मारेल अशी धमकी दिली. अखेर या त्रासाला कंटाळून डॉक्टरांनी शहर पोलिसांत तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी आठ आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यामधील पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.

अशी घडली घटना

           शुक्रवार, दि.13 ऑक्टोबर रोजी दुपारी हृदयरोगतज्ञ डॉक्टरला फोन आला की, मी तुमचा परिचित असलेल्या अजय नागपुरे यांच्या ओळखीचा असून घरी कॅन्सरचा पेशंट आहे. तुम्ही तपासायला घरी येऊ शकता का? अशी विचारणा केली व त्याने आपले नाव दीक्षांत नवघरे असून माझ्या घराचा पत्ता विजय वाईन बार शेजारी खामगाव रोडच्या बाजूला शाहू कॉलेजला जाणारा रस्ता असल्याचे सांगितले. यानंतर डॉक्टरांनी स्वतःच्या जवळील दुचाकी वाहन घेवून सांगितलेल्या पत्त्यावर पोहचले.
            यावेळी तिथे रस्त्यावरील बाईकस्वाराने डॉक्टरला हात देत दीक्षांत नवघरे असल्याचे सांगितले, मीच फोन केला होता असे म्हणून दीक्षांत याने डॉक्टरला घेऊन घरी गेला. याप्रसंगी त्या घरात सात ते आठ तरुण आधीच उपस्थित होते. त्यांचे विस ते पंचवीस जवळपास वयोगटातील होते. त्यांनी एकाएकी डॉक्टरच्या पाठीवर, हातावर, कानावर, मारहाण केली. यामधीलच एकाने कोयत्या सारख्या शस्त्राचा धाक दाखवून डॉक्टरच्या खिशातून 10 हजार रुपये काढून घेत डॉक्टरांच्या अंगावरील कपडे काढून त्यांना नग्न केले. यावेळी दीक्षांत याच्याही अंगावरील पूर्ण कपडे काढलेले होते. डॉक्टरला दीक्षांतच्या जवळ उभे करून डॉक्टरचा अश्लील व्हिडिओ शुट करण्यात आला. त्यानंतर डॉक्टरांना आरोपी तरुणांनी दुचाकीने शहरातीलच चिखली रोडवरील वृंदावन नगरातील मोकळ्या जागेत नेले तिथे दोन तीन जण पांढर्‍या चार चाकी वाहनामधून आले व त्यांनी आपसात काहीतरी चर्चा केली. यातील एक जण डॉक्टरांच्या परिचित अजय नागपुरे हा होता. हे लोक तुमचा व्हिडिओ व्हायरल करतील. तुमच्या मुलांच्या जीवाचे बरे वाईट करतील, तुम्ही त्यांना 20 लाख रुपये द्या, बाकी मी पाहून घेतो असे अजयने डॉक्टरला सांगितले.
           यावेळी डॉक्टरने घाबरून त्याचा मित्रांकडून साडेआठ लाख रुपये घेऊन आरोपी तरुणांच्या जवळ दिले. या तक्रारीवरुन बुलडाणा शहर पोलीसांनी Buldana City Police तपासाला गती देत पाच आरोपींना अटक केली असून उर्वरित तिन आरोपी अद्याप फरार आहेत. पुढील तपास बुलडाणा शहर पोलीस करीत आहेत.

हे आहेत आरोपी-  अजय नागपुरे, दीक्षांत नवघरे, विशाल गायकवाड, सूरज पसरटे, आदेश राठोड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें