शेतकरी बांधवांनो तुम्हाला शेतमाल तारण कर्ज योजना माहिती आहे का?

कृषि पणन मंडळाच्या शेतमाल तारण कर्ज योजनेचा शेतकर्‍यांनी लाभ घ्यावा

शेतमाल तारण कर्ज योजनेत या पिकांचा समावेश

तूर, मूग, उडीद, सोयाबीन, सुर्यफूल, चना, भात (धान), करडई, ज्वारी, बाजरी, मका, गहू, वाघ्या घेवडा (राजमा), बेदाणा, हळद, काजू बी व सुपारी अशा पिकांचा समावेश केलेला आहे.

               राज्यातील शेतकर्‍यांनी उत्पादित केलेला शेतमाल काढणी हंगामात त्याच्या आर्थिक निकडीमुळे त्वरीत विक्रीसाठी बाजारात आणतात. विक्रीसाठी एकाचवेळी बाजारपेठेत शेतमालाची मोठ्या प्रमाणात आवक होते व बाजारभाव कमी होऊन शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान होते. शेतकर्‍यांनी शेतमालाची काही काळासाठी साठवणूक करुन बाजारभाव चांगले असताना साठवणुकीतील शेतमाल टप्याटप्याने विक्रीसाठी आणला तर शेतकर्‍यांना त्याचा फायदा होऊ शकतो.

             शेतकर्‍यांना असणारी आर्थिक निकड पुर्ण होऊन, त्यांच्या शेतीमालासाठी रास्त भाव मिळावा या दृष्टीकोनातून, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळामार्फत सन 1990-91 पासून शेतमाल तारण कर्ज योजना राबविण्यात येत आहे. या योजने अंतर्गत शेतकर्‍यांनी बाजार समितीच्या गोदामात अथवा वखार महामंडळाच्या गोदामात ठेवलेल्या शेतमालाच्या गोदाम पावतीवर शेतमालाच्या चालू बाजार भावानुसार रकमेच्या 75 टक्के पर्यंतची रक्कम त्या शेतकर्‍यास 180 दिवसांच्या मुदतीसाठी द.सा.द.शे. 6 टक्के व्याजाने तारण कर्ज बाजार समितीकडून त्वरीत देण्यात येते.

                शेतमाल तारण कर्ज योजनेअंतर्गत फक्त उत्पादक शेतकर्‍यांचा शेतमाल स्वीकारला जातो. व्यापार्‍यांचा शेतमाल या योजनेअंतर्गत स्विकारला जात नाही. प्रत्यक्षात तारणात ठेवण्यात आलेल्या तूर, मूग, उडीद, सोयाबीन, सुर्यफूल, चना, भात (धान), करडई, ज्वारी, बाजरी, मका, गहू, वाघ्या घेवडा (राजमा), बेदाणा, हळद, काजू बी व सुपारी या 17 शेतीमालाच्या बाजारभावाच्या एकूण किमतीच्या 75 टक्के पर्यंतचे कर्ज वार्षीक 6 टक्के व्याज दराने योजनेस सुरूवात केल्याच्या तारखेपासून सहा महिन्यांचे (180 दिवस) मुदतीकरीता अदा करण्यात येते. बाजार समितीमध्ये शेतक-याचा आधारकार्ड क्रमांक घेऊन व त्याची खात्री करूनच तारण कर्ज अदा केल्या जाते. प्रत्यक्षात तारण ठेवलेल्या शेतमालाची किंमत ही तत्कालीन बाजारभाव किंवा शासनाने जाहिर केलेली आधारभूत किंमत यापैकी जी कमी असेल त्यानुसार ठरविण्यात येते. तारण कर्जाची मुदत 6 महिने (180 दिवस) आहे. तारण कर्जाचा व्याज दर 6 महिन्याकरीता द. सा. द. शे. 6 टक्के राहील. शेतकर्‍यांनी या योजनेमध्ये शेतमाल तारण ठेवतांना तो वाळलेला व स्वच्छ केलेला असावा जेणे करुन मॉईश्चर असलेला शेतमाल साठविल्यास त्याला बुरशी व किड लागुन तो खराब होणार नाही.
           शेतकर्‍यांनी राज्य वखार महामंडळ, केंद्रीय वखार महामंडळ डब्ल्यू. डी. आर. ए. (WDRA) यांच्या मानकांची पूर्तता करणार्‍या गोदामात ठेवलेल्या शेतमालाच्या वखार पावतीवर सुध्दा शेतकर्‍यांना बाजार समिती मार्फत या योजने अंतर्गत लाभ देण्यात येतो. शेतमालाचा योजनेत समावेश करण्यात आलेला आहे, त्या शेतमालाच्या तारणावर फक्त शेतकर्‍यांना ते ज्या दिवशी शेतमाल तारणात ठेवण्याकरिता आणतील त्या दिवसाचे शेतमालाचे बाजारभाव विचारात घेऊन शेतमालाच्या होणार्‍या एकूण किंमतीनुसार रक्कम तारण कर्ज म्हणून सहा महिने (180 दिवस) मुदतीसाठी वार्षिक 6 टक्के व्याजदराने बाजार समितीकडून स्वनिधीतून NEFT/RTGS  द्वारे त्याचदिवशी अदा करण्यात येते.

                 तारण माल ठेवण्यासाठी बाजार समिती त्यांच्या गोदामाची विनामुल्य उपलब्धता शेतकर्‍यांना करुन देणे. गोदाम भाडे, गोदामापर्यंतचा वाहतुक खर्च, देखरेख खर्च, शेतमालाचा विमा इत्यादी खर्चाचा अधिभार बाजार समिती सहन करणार असून गोदामामध्ये शास्त्रशुध्द पध्दतीने मालाची साठवणूक करण्याची जबाबदारी संबंधित बाजार समितीची आहे. शेतकरी तारण मालाची स्वतः विक्री करणार असतील त्यांनी सहा महिन्यात 180 दिवसांचे आत) कर्ज रकमेची व्याजासह परतफेड करुन तारण माल ताब्यात न घेतल्यास या शेतमालाची विक्री बाजार समिती करेल. तारण कर्जाची रक्कम शेतकरी यांनी कृषि पणन मंडळाकडे वेळेवर भरणा न केल्यास अथवा 180 दिवसांची मुदत संपल्यापासून या रक्कमेवर मुदतीनंतर सहा महिन्यांपर्यंत वार्षिक 8 टक्के दराने व त्याचे पुढील 6 महिन्यांसाठी वार्षिक 12 टक्के व्याजदराने व्याज आकारणी केली जाईल. तथापि, अशा परिस्थितीमध्ये तारण कर्ज घेतल्यापासून 18 महिन्याचे आत संपुर्ण कर्जाची सव्याज परतफेड करणे आवश्यक आहे. या योजनेच्या अधिक माहितीसाठी शेतकर्‍यांनी संबंधित तालुक्याच्या कृषि उत्पन्न बाजार समिती कार्यालयाशी संपर्क साधावा.

हे आहेत बुलढाणा जिल्हयातील कृषि उत्पन्न बाजार समिती सचिव यांचे नाव व मोबाईल क्रमांक
(Name and mobile number of Secretary of Agriculture Produce Market Committee in Buldhana district)

कृषि उत्पन्न बाजार समिती
बुलढाणा वनिता साबळे, सचिव 9422884745
चिखली रमेश शेटे, सचिव 9423739941
देऊळगांवराजा किशोर म्हस्के सचिव 9850871246
सिंदखेडराजा समाधान शेळके, सचिव 9765759134.
लोणार भालेराव सचिव 7822022972
मेहकर प्रमोद देशमुख सचिव 9850383719
खामगांव गिरीष सातव सचिव 9421495028
शेगांव विलास पुंडकर सचिव 8149774441
संग्रामपुर पंकज मारोडे सचिव 9637110747
जळगांव जामोद प्रमोद पुदाके सचिव 9421465077
नांदुरा अमोल चोपडे सचिव 9552292323
मलकापुर राधेशाम शर्मा सचिव 7722090681
मोताळा सुरेश राहाणे सचिव 9421473297.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें