गोळाफेक स्पर्धेसाठी कोमल बोरसे ची राज्यस्तरावर निवड

buldhananews.com

         बुलढाणा येथील शारदा ज्ञानपीठ Sarada Dnyanpeeth ची विद्यार्थीनी कु.कोमल गजानन बोरसे हिने विभागीय स्तरीय गोळाफेक क्रिडा स्पर्धेत लढत देत व्दितीय क्रमांक पटकाविला (throw ball Selection at  Komala Borse buldhana) असून तिची राज्यस्तरावर निवड झालेली आहे. या यशाबद्दल कोमल हिचे अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

            कोमल बोरसे हिने अत्यंत प्रतिकुल परिस्थितीचा सामना करत तालुकास्तरावर प्रथम क्रमांक, जिल्हा स्तरावर व्दितीय क्रमांक पटकाविला असून विभागीय स्तरावर व्दितीय क्रमांक पटकावित राज्यस्तरीय स्पर्धेला निवड झाली असुन तिने आपल्या या यशाचे सर्व श्रेय शारदा ज्ञानपीठचे क्रीडा शिक्षक राहुल औशलकर सर व अजय राजपुत सर यांना दिले तसेच खाजगी प्रशिक्षक सुदाम बोरसे सर यांना दिले आहे.

           तिच्या या यशाबद्दल बुलढाणा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.विद्यानंद देशपांडे, उपाध्यक्ष तुषार महाजन, सचिव अ‍ॅड. रामानंद कविमंडन शाळेचे व्यवस्थापक अ‍ॅड. आनंद चेकेटकर व सर्व संचालक मंडळ तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ.प्रमोद देशपांडे, शाळेच्या प्रशासक जगताप मॅडम, मुख्याध्यापिका अंतरकर मॅडम, उपमुख्याध्यापक दिपक देशपांडे, गिरीश चौधरी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले तसेच कोमल बोरसे हिस पुढील यशाकरीता शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें