जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांची संकल्पना
बुलढाणा न्यूज – कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांचेद्वारे गुरुवार, दि.12 ऑक्टोबर 2023 रोजी शेतकरी उत्पादक कंपनी व गट यांचेकरिता जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथील जिल्हा नियोजन समिती सभागृहात या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेचे उदघाटन डॉ.किरण पाटील जिल्हाधिकारी बुलढाणा यांचे हस्ते करण्यात आले. विभागीय कृषी सहसंचालक, किसन मुळे अमरावती, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार ढगे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पुरुषोत्तम उन्हाळे, प्रकल्प संचालक (आत्मा), उपस्थित होते. सहाय्यक आयुक्त सुरेंद्र गावडे, मत्सव्यवसाय विभाग, एन.एस.अंभोरे, दादाराव हटकर प्रगतशील शेतकरी -शेळीपालन , प्रविणजी वानखडे, निर्यातदार नागपूर, यांनी सकाळच्या सत्रात शेतकर्यांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले.
श्री.दिलीप राठोड, सलाम किसान संस्था मुंबई, यांनी ड्रोनद्वारे फवारणी, आधुनिक शेती व कृषि माल खरेदी विक्री या विषयावरती शेतकर्यांशी संवाद साधला. श्री. विजय काळे, जिल्हा व्यवस्थापक महाऊर्जा यांनी दुपारच्या सत्रामध्ये महाकृषि उर्जा अभियान पीएम किसान कुसुम योजनेविषय शेतकर्यांना मार्गदर्शन केले व जास्तीत जास्त शेतकर्यांनी सौर उर्जेच्या वापराकडे वळावे याकरिता अत्यंत महत्वाची असे मार्गदर्शन केले. या कार्यशाळेच्या सुरुवातीला प्रास्ताविक जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बुलढाणा यांनी केले तर यावेळी बोलताना त्यांनी जास्तीत जास्त शेतकर्यांनी सामूहिक शेतीकडे वळावे व शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्यानी कृषि विभागाच्या योजनांचा लाभ घेऊन प्रक्रिया उद्योग उभारावेत. तसेच श्री मुळे विभागीय कृषि सहसंचालक यांनी शेतकरी गट/कंपन्यां ते ग्राहक ही साखळी तयार व्हावी व शेतकर्यांनी कृषि क्षेत्रामध्ये उन्नती घडून क्रांती करावी असे मत व्यक्त केले.
श्री. सुरेंद्र गावडे सहाय्यक आयुक्त यांनी मत्स्यव्यवसाय विभागाच्या योजनांची माहिती देऊन शेतकर्यांनी मत्स्यपालन करून उन्नती साधण्याचे आवाहन केले. कृषि उत्पाद्नांची निर्यात या विषयावर श्री प्रविण वानखडे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी त्यांनी शेतकर्याच्या पोराने आता जागतिक बाजारपेठेत उतरावे आणि त्यासाठी युनिव्हर्स एक्स्पोर्ट नागपूर च्या माध्यमातून सहकार्य पूर्णपणे करण्याचे आश्वासीत केले. श्री. मयूर लोणकर, अग्रणी बँक यांनी AIF-कृषि पायाभूत योजनेवरती मार्गदर्शन करून जास्तीत जास्त शेतकर्यांनी 2 कोटी रु पर्यतच्या कर्जावरच्या व्याजावर सवलत घेण्याचे आवाहन केले. नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक श्री. रोहित गाडे यांनी नाबार्डच्या योजना बाबत सादरीकरण केले. मा. जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी शेतकरी गट, कंपनी यांना साद घालताना त्यांनी आपआपल्या क्षमता ओळखून एक नवीन ठसा कृषि क्षेत्रात उमटावा, सामूहिक पद्धतीने शेतकर्यांनी प्रगती करावी. तसेच शेतकर्यांनी सामूहिक प्रगतीसाठी सामूहिक चिंतन करावे. महिला प्रभाग संघाच्या महिला बचत गटांनी लोणचे/पापड उद्यागाच्या पलीकडे आपल्या क्षमता ओळखून प्रगती करावी. एक जिल्हा एक ब्रँड करून सर्व गट कंपन्यानी प्रक्रिया करून राजमाता नावाने जिल्ह्याचा ब्रँड तयार करावा. जिल्ह्यातील शेतकरी कंपन्या, शेतकरी गट व महिला प्रभाग संघाच्या बचत गटांना आवाहन केले सर्वांनी एका प्लेटफार्मवरती येवून जिल्ह्याचा एक ब्रँड तयार करण्यात यावा व जिल्ह्याची एक वेगळी ओळख निर्माण करावी, बुलढाणा जिल्हाची आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून असलेली ओळख पुसून हा जिल्हा कृषी उत्पादने निर्यातदार जिल्हा म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी शासन स्तरावरून सर्वोतपरी मदत करण्याचे. तसेच प्रत्येक महिन्याला अशी एक कार्यशाळा घेवून खरेदीदार ते विक्रीदार अस समेट घडवून आणावे तसेच शेतकर्यांना नवनवीन तंत्रज्ञान अवगत करता येईल जेणेकरून कृषि क्षेत्रातील नवीन संधी शोधता येतील. पुरुषोत्तम उन्हाळे यांनी बिजोत्पादन कोणी करावे, कसे करावे , त्याचे मापदंड कशाप्रकारे असतात , बिजोत्पादानातून शेतकरी गट व शेतकरी कंपन्यांनी जिल्हाची नवीन ओळख निर्माण करून आर्थिक प्रगती साधावी असे आवाहन केले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन मोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन बिपीन राठोड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आत्मा व कृषी विभाग कार्यालयातील सर्व अधिकारी/कर्मचारी यांनी मेहनत घेतली.