भाईजी यांच्या हस्ते कुलवृत्तान्त पुस्तकांचे प्रकाशन (Publication of books)

इ.स.1600 ते 2013 या काळातील 400 वर्षाचे वंशावळीचे कुलवृत्तान्त पुस्तकांत समावेश

डॉ.प्रमोद देशपांडे यांनी केले ॠणनिर्दश व्यक्त
डॉ.प्रमोद देशपांडे Dr. Pramod Deshpande यांनी आपल्या 76 वर्षाच्या जीवनातील मदत करणार्‍यांना प्रति ॠणनिर्दश व्यक्त करताना जेव्हा 1992 मध्ये त्यांना हृदयविकाराचे बायपास शस्त्रक्रिया करण्यात आले. त्यावेळी राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी यांनी पैसा व रक्तदान करणारे मंडळी घेऊन मुंबईला आले तसेच कै.भास्करराव शिंगणे यांचे पुत्र माजी मंत्री आमदार राजेंन्द्र भास्करराव शिंगणे यांनी केलेल्या मदतीबद्दल ॠण व्यक्त केले.

   

        बुलढाणा न्यूज – बुलढाणा तालुक्यातील डोंगरखंडाळा गावातील बालरोग तज्ज्ञ डॉ.प्रमोद देशपांडे यांच्या देशपांडे परिवारातील प्रभावी परोपकारी व्यक्तिमत्त्व असलेले त्यांचे वडील कै.भाऊसाहेब देशपांडे यांनी डोंगरखंडाळा गावातील सर्व समाजातील लोकांसाठी केलेल्या कार्यासह इ.स.1600 ते 2013 या काळातील 400 वर्षाचे वंशावळीचे कुलवृत्तान्त पुस्तकाचे अक्षरबध्द करुन बुलढाणा येथील एडेड हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय येथे बुलडाणा अर्बन संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी यांच्या हस्ते, तसेच बुलडाणा एज्युकेशन सोसायटी व्यवस्थापक मंडळ, नातेवाईक व एडेड हायस्कूल व शारदा ज्ञानपीठ बुलढाणा येथील कर्मचारी वृंद यासोबतच डोंगरखंडाळा गावातील रहिवासी तसेच या पुस्तकाचे लेखक रघुनंदन देशपांडे यांच्या उपस्थितीत प्रकाशित करण्यात आले.

          यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले बुलढाणा अर्बनचे राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना डॉ.देशपांडे सोबत बालपण आपल्या जुन्या मैत्रीच्या आठवणीला उजाळा दिला.
          यावेळी उपस्थितांचे आभार प्रदर्शन सौ.रंजना रमेश देशपांडे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला बुलढाणा शहरातील नागरिक तसेच देशपांडे परिवारावर प्रेम करणारे बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें