बुलढाणा न्यूज – चिखली तालुक्यातील खंडाळा मगरध्वज येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र भगवान साळवे यांच्या मातोश्री शांताबाई भगवान साळवे Shantabai Salve यांचे शनिवार दि.14 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 84 वर्षे होते.त्यांच्या पाठीमागे दोन मुले, दोन मुली, नातवंड व बराच मोठा आप्तपरिवार आहे.
शांताबाई साळवे ह्या पत्रकार संजय निकाळजे यांच्या आजी होत्या.त्यांच्या रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम सोमवार,दि.16 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता खंडाळा मकरध्वज येथे ठेवण्यात आहे. यांची संबंधितांनी नोंद घ्यावी.