जिल्हा परिषद बुलढाणा सरळसेवा भरती प्रक्रीया 2023

www.buldhananews.com

Zilla Parishad Buldhana Direct Service Recruitment Process 2023

              बुलढाणा न्यूज- ग्रामविकास व पंचायतराज विभागांतर्गत जिल्हा परिषदेतील गट-क मधील विविध संवर्गातील शासन स्तरावरुन राबविण्यात येत असलेल्या भरती प्रक्रियेकरीता जाहीरात क्र.1/2023 दिनांक 05/08/2023 नुसार प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
        सरळसेवा भरती प्रक्रीया 2023 करीता कनिष्ठ लेखा अधिकारी, कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) व कनिष्ठ अभियंता (विद्युत) या संवर्गातील परिक्षा दिनांक 15/10/2023 रोजी व तारतंत्री ,(Wireman) जोडारी (Fitter), व पशुधन पर्यवेक्षक (Livestock Supervisor) या संवर्गाची दिनांक 17 ऑक्टोबर 2023 रोजी होणार असल्याने सदर संवर्गातील परिक्षेकरीता प्रवेशपत्र उपलब्ध होण्याकरीता जिल्हा परिषद बुलढाणा www.zpbuldhana.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर लिंक उपलब्ध करुन देण्यात  आलेली आहे. याबाबत सर्व संबंधीत उमेदवारांनी नोंद घ्यावी. नोडल अधिकारी तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष पवार (साप्रवि) जिल्हा परिषद बुलढाणा यांनी कळविले आहे.

www.buldhananews.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें