आज खामगावात छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रा

बुलढाणा न्यूज

          खामगाव (बुलढाणा न्यूज)- विश्व हिंदू परिषद, बजरंद दल यांच्या संयुक्त विद्यमानाने बुलढाणा जिल्हयातील प्रत्येक तालुक्यात श्री छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रा काढण्यात येत आहे.

         ही शौर्य यात्रा शनिवार, 7 ऑक्टोंबर 2023 रोजी दुपारी ठिक साडे चार वाजता शहरात येणार आहे. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयम येथून भव्य मोटार सायकल रॅली काढण्यात येणार असून ही रॅली शहरातील अर्जुन जलमंदिर, महावीर चौक, फरशी भाग, भगतसिंह चौक, टॉॅवर चौक, जलंब नाका, चांदे कॉलनी जलंब रोड अशी मार्गक्रमण करणार आहे. यावेळी वाडी येथील विहिंप कार्यालय येथे समारोप करण्यात येणार आहे. तरी या जागरण यात्रेत हिंदू बांधव, शक्ती उपासक, मठ मंदिराचे पदाधकिारी आदींनी मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

माजी राष्ट्रपती स्व.डॉ.एपीजे अब्दुल कलाम जन्मदिनी दि. 15 ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें