The systems in the district should work with a charitable attitude
ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांचे आवाहन
बुलढाणा न्यूज- दिव्यांगांच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी यंत्रणांतील सर्वांची कार्यशाळा घ्यावी, याच बरोबरच दिव्यांगांचा शोध घेण्यापासून त्यांना लाभ मिळण्यापर्यंत माहिती देण्यात यावी, तसेच कर्मचार्यांनी प्रत्येक गावनिहाय सर्व्हेक्षण केल्यास यात चांगले कार्य होणार आहे. दिव्यांगांसाठी कार्य करीत असताना दिव्यांग बालके जन्माला येऊ नये यासाठी यंत्रणा उभारून कार्य केल्यास दिव्यांगत्वाचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. यात आरोग्य यंत्रणांना चांगले कार्य करता येईल, दिव्यांगांसाठी कार्य करीत असताना यंत्रणांनी जबाबदारीपेक्षा कर्तव्य म्हणून कार्य करावे. यंत्रणांकडे आलेला एकही दिव्यांग व्यक्ती परत जाऊ नये. सेवाभावी दृष्टीकोन ठेऊन जिल्ह्यातील यंत्रणांनी कार्य करावे. दिव्यांगाच्या बाबतीत केलेल्या कार्याचा इतर जिल्ह्यांनी आदर्श ठेवावा, असे आवाहन ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू त्यांनी केले.ते दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियानाचे मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात दिव्यांगांच्या प्रश्नाबाबत जिल्हास्तरीय यंत्रणांची आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील उपस्थित होते.
श्री. कडू म्हणाले, जिल्ह्यातील दिव्यांग मेळावा यशस्वीपणे पार पडला आहे. यातून दिव्यांगांसाठी करावयाची कार्य समोर आले आहे. प्रामुख्याने एका कुटुंबात अधिक दिव्यांग असलेल्या कुटुंबांना प्राधान्याने लाभ देण्यात यावे. यामुळे त्यांचे जगणे सुकर होईल. दिव्यांगांकडून प्रामुख्याने घरकुल आ
णि सानुग्रह अनुदानाची मागणी होते. मात्र या पुढे जाऊन त्यांना रेशन, रोजगार, शिक्षण, रोजगार, आरोग्याच्या सेवा आदी देण्यासाठी यंत्रणांनी पुढाकार घ्यावा. बैठकीपुर्वी कारंजा चौकातील व्यास बालोद्यान येथे ताराबाई शिंदे यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन श्री. कडू यांनी केले.
उर्वरीत धान्य दिव्यांगांना वाटप मान्यता घेण्यात यावी
दिव्यांगांना अंत्योदय योजनेतून रेशन मिळण्याची सुविधा आहे. मात्र हा लाभ त्यांना होत नाही. त्यामुळे महिन्याच्या शेवटी उचल झाला नसल्यास उर्वरीत धान्य दिव्यांगांना वाटप करण्यासाठी प्रस्ताव पाठवून मान्यता घेण्यात यावी आणि त्यानुसार रेशन वाटप करण्यात यावे. शिक्षण क्षेत्रात होतकरू विद्यार्थ्यांसाठी विशेष तरतूद करावी. दिव्यांगांच्या शाळा डिजीटल होण्यासाठी पुढाकार घ्यावा. जेणेकरून हे विद्यार्थी समोर जाऊ शकतील.
प्रत्येक गावात सर्व्हेक्षण करून दिव्यांगांच्या समस्या जाणून घेतल्या जातील
दिव्यांगाच्या क्षेत्रात कार्य करण्यास वाव आहे. प्रत्येक गावात सर्व्हेक्षण करून दिव्यांगांच्या समस्या जाणून घेतल्या जातील. दिव्यांगांचे प्रमाणपत्र देण्यामध्ये मध्यस्थाशिवाय कार्य करण्यात यावे. ग्रामपंचायतीने दिव्यांगांचा निधी वितरीत केला नसल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. तसेच सधन असलेल्या दिव्यांगांनी अनुदान सोडल्यास गरजू दिव्यांगांना लाभ देता येईल, असे सांगितले.
– डॉ.पाटील जिल्हाधिकारी, बुलढाणा.
पिंपळगाव सराई-सैलानी रस्त्यावर अपघात, मोटार सायकल चालक ठार तर पत्नी जखमी