हिवाळी 2023 पर्यावरण अभ्यास विषयाची परीक्षा शनिवार दि.18 नोव्हेंबर रोजी होणार

बुलढाणा न्यूज

संबंधित विद्यार्थ्यांनी नोंद घेण्याचे विद्यापीठाचे आवाहन
           अमरावती (बुलढाणा न्यूज) – संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या वतीने विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, पर्यावरण अभ्यास विषयाची लेखी परीक्षा ज्या परीक्षार्थ्यांना देणे आवश्यक आहे अशा परीक्षेस पात्र असलेल्या व परीक्षा आवेदनपत्र भरलेल्या हिवाळी-2023 मध्ये प्रवेशित होणार्‍या माजी विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा विद्यापीठाव्दारे निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर शनिवार, दिनांक 18 नोव्हेंबर, 2023 रोजी सकाळी 9 ते 12 या वेळेमध्ये होणार आहे.
          परीक्षेच्या विद्यार्थ्यांना पर्यावरण अभ्यास (Environmental Studies Subject Examination) या आवश्यक विषयाच्या प्रश्नपत्रिकेच्या वेळात्रकाची माहिती देण्याबाबत परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक सौ.मोनाली तोटे पाटील यांनी संलग्नित महाविद्यालयांचे प्राचार्य, केंद्राधिकारी तसेच विद्यापीठातील शैक्षणिक विभाग प्रमुख यांना पत्र पाठवून कळविले आहे.
         तरी सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन विद्यापीठाच्यावतीने करण्यात येत आहे. अधिक माहितीकरीता संचालक सौ.मोनाली तोटे पाटील मोबा.9763833969 यांचेशी संपर्क साधता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें