बुलढाणा न्यूज (Buldhana News)
चिखली- माजी सैनिकांची बिना परिश्रम यश कहा या सैनिकी संघटनेचा वर्धापनदिन चिखली येथील राजवाडा रिसॉर्ट मेहकर फाटा चिखली येथे रविवार दि.1 ऑक्टोबर 2023 रोजी उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सुभेदार मेजर सुरेश तेलंग, उदघाटक म्हणून मेजर यादव म्हस्के, कॅप्टन वालचंद परमेशोर, ज्ञानेश्वर ठेंग, केशव सोनुने, नंदु ढाकरके, गौतम सावळे, संजय खंडारे, शेषराव चव्हान, कॅ.रामदास लहाने, रमेश अवसरमोल, भिमराव वानखेडे, गुलाब पानझडे, अशोक पवार, विजय जाधव, काशिनाथ इंगळे, दत्ता गवई, सतिश पवार आदी उपस्थित होते.
या वेळी इतिहास अभ्यासक राजेश साळवे म्हणाले की महार रेजिमेंट देशातली अशी एकमेव रेजिमेंट आहे. ज्यामध्ये देशातल्या सगळ्या भागातल्या वेगवेगळ्या समुदायातील सैनिकांचा समावेश आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचा आहे, परंतु भारतीय सेनेमध्ये या रेजिमेंटचा समावेश 1 ऑक्टोबर 1941 रोजी करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरक्षा सल्लागार समितीचे सदस्य झाल्यानंतर या रेजिमेंटच्या भारतीय सैन्यातील समावेशासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले.
वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष सतिश पवार म्हणाले की, महार रेजिमेंट चा जाज्वल्य गौरवशाली इतिहास आहे. अनेक या रेजिमेंटने अनेक युद्धांमध्ये हिरीरीने सहभाग नोंदविला व अनेक विक्रम घडविले. परंतु सैनिक देशसेवा करून सेवानिवृत्त होऊन आल्यानंतर समाज मात्र त्यांना सामाजिक, राजकिय प्रवाहात पाहिजे तेव्हढ्या प्रमाणत सामील करुन घेत नाही ही मोठी शोकांतिका आहे. म्हणुन मेजर लक्ष्मण साळवे हे संघटनेच्या माध्यमातून सैनिकांच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. त्यांच्या प्रत्येक कार्यात आम्ही होईल ती मदत करु अशी ग्वाही दिली. तर मेजर लक्ष्मण साळवे यांनी आणि माजी सैनिकांची पाहिली पतसंस्था लवकरच सुरु करणार असल्याची घोषणा केली.कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहण करुण, चिखली तालुक्यातील शहीद स्मारकपर्यंत अभिवादन रॅली काढण्यात आली. 1962,1965, 1971, 1999 च्या युद्धात ज्यांनी ज्यांनी सहभाग नोंदविला, असे विर जवान, शहीद वीर पत्नी, वीर माता यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मेजर लक्ष्मण साळवे यांनी केले. आभार प्रदर्शन मेजर रमेश साळवे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकाश मिसळकर, पंडित जाधव, राहुल जाधव, जय शिरसाठ सुनिल साबळे, रमेश ओव्हाळे, अर्जून साबळे, राजु वानखेडे, गणेश जाधव, सीताराम मोरे, अशोक बोरकर, विठ्ठल गवई आदींनी परिश्रम घेतले.