बुलढाणा न्यूज
मलकापूर – सदगुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने रविवार, दि. 1 ऑक्टोबर 2023 रोजी मलकापूर येथे स्थानिक रेल्वे स्टेशन मलकापूर परिसरात सकाळी 8.30 वा ते 12.00 वा. पर्यंत स्वच्छता अभियान राबविण्यात आले होते. यामध्ये संत निरंकारी मिशनचे सेवादल आणि निरंकारी भक्तांनी निस्वार्थपणे सहभागी होऊन रेल्वे स्टेशन परिसरात साफसफाई करण्याचे काम केले.
संत निरंकारी (Sant Nirankari Mission) मिशनद्वारा नेहमीच समाजोपयोगी कामाला प्राथमिकता दिली जाते. ज्यामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिरे, मोफत आरोग्य शिबिरे जिल्हयातील विविध भागांमध्ये राबविले जातात.
या स्वच्छता अभियानामध्ये रेल्वे प्रशासनाने देखील सहकार्य केले. त्यामध्ये स्वतः स्टेशन प्रबंधक उपस्थित राहून त्यांनी मिशनच्या कामाची प्रशंसा केली. वेळोवेळी मिशनच्या सेवादल आणि निरंकारी भक्त यांच्याद्वारे याप्रकारचे कार्य घडत राहो, यासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या शेवटी निरंकारी मिशनचे सेवादल संचालक महात्मा यांनी स्वच्छता अभियान मध्ये सहभागी झालेल्या सर्व सेवादल, निरंकारी महात्मा आणि रेल्वे प्रशासनाचे आभार मानले.