बुलढाणा न्यूज – देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या संकलपनेतून महात्मा गांधी जयंती पूर्वी स्वच्छता अभियान संपूर्ण देशात उत्साहात राबविण्यात येते. बुलढाणा शहरातील एडेड हायस्कूल मध्ये देखील ही संकल्पना राबविण्यात आली व यातील विशेषता म्हणजेच गांधी विचारांचे आनुयायी तथा संस्थेचे माजी उपाध्यक्ष, बुलडाणा नपा चे माजी उपाध्यक्ष तसेच सेवा दलाचे कार्यकर्ते वयोवृद्ध बाबासाहेब महाजन यांच्या नेतृत्वात शालेय परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष तुषारजी महाजन, संचालक आनंदजी चेकेटकर तसेच मुआ किंबहुने सर, उपमु जोशी सर, पर्यवेक्षिका निकाळजे मॅडम, छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार प्राप्त पर्यवेक्षक आर.एन.जाधव तथा समस्त शिक्षक वृंद उपस्थित होते. यावेळी शालेय परिसर तसेच आजूबाजूचा परीसराची स्वच्छता करण्यात आली. या उपक्रमामध्ये शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच एनसीसीचे मुले व मुली प्रशिक्षणार्थी हे देखील आवर्जून उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना स्वच्छत ेबाबत शपथ देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.