धामणगाव बढे येथील मुस्लीम युवकाचा आदर्श
बुलढाणा न्यूज-
मोताळा – तालुक्यातील धामणगाव बढे येथे मुस्लिम युवकांच्या वतीने ईद मिलादच्या शुभ प्रसंगी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी रक्तदान शिबिरचे आयोजन ही करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात 41 रक्तदात्यांनी रक्तदान केले असून समाजा समोर एक आदर्श
निर्माण केला आहे. या रक्तदान शिबिराप्रसंगी रक्तदात्यांना प्रमाणपत्र धामगणगाव बढे ठाणेदार व सरपंच पती मोहन सपकाळ यांच्या हस्ते तसेच मुस्लिम युवक निईजन समितीचे शेख नदीम शेख बिस्मिल्लाह कुरेशी,नाझीम शाह बुढन शाह,मोईन नझीर पटेल, शेख अमीन शेख खाजा,शेख रईस शेख युनूस कुरेशी,मुस्तकीम शाह मुखतार शाह,अजीज लाला तडवी या समितीच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहे.
तसेच ईद मिलाद नबी निमित्ताने बाईक रॅली उत्साहात पार पडली. या बाईक रॅलीत तिनशेच्या वर युवकांनी बाईक व पायदळ रॅली काढली होती. या रॅलीकरिता व रक्तदान शिबिराकरिता जनहितार्थ तसेच मोहम्मद (स) सर्वांसाठी या भूमिकेत सदरहू कार्यक्रम राबविण्यात आले असल्याचे नियोजन समितीने स्पष्ट केले असून असाच हेतू पूर्ण करण्याचा एक प्रयत्न असल्याचे सांगितले आहे. सदरहू सफल नियोजन करिता धामणगाव बढे गावातील मुस्लिम समाज प्रतिष्ठतीत लोक ग्रामपंचायतचे सहकार्य लागला असून सदरहू कार्यक्रमच्या निमित्ताने नवनिर्वाचित सरपंच पती मोहन सपकाळ व उपसरपंच व धामणगाव बढेचे ठाणेदार यांचे हस्ते सत्कार करण्यात येवून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आले आहे.
भाजपाची नुतन बुलढाणा जिल्हा कार्यकारणी घोषित
……………………………………………………………………………………………………………………………………………….