दिव्यांग लाभार्थ्यांसाठी मिनी पिठाची गिरणी पुरविण्याची योजना

बुलढाणा न्यूज

बुलढाणा न्यूज – जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातर्फे 5 टक्के दिव्यांग कल्याण योजनेंतर्गत सन 2023-24 या वित्तिय वर्षासाठी ग्रामीण भागातील दिव्यांग लाभार्थ्यांसाठी मिनी पिठाची गिरणी पुरविण्याची योजना घेण्यात आली आहे.

या योजनेचे अर्ज पंचायत समितीस्तरावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागातील दिव्यांग लाभार्थ्यांनी परिपूर्ण अर्ज अनुषंगिक सर्व कागदपत्रांसह संबंधित गट विकास अधिकारी, पंचायत समिती कार्यालयामध्ये दि. 10 ऑक्टोबर 2023 पर्यंत सादर करावेत. सदर योजनेचा लाभ ग्रामीण भागातील दिव्यांग लाभार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत यांनी केले आहे.

 

शुक्रवारचे दिव्यांग तपासणी शिबीर रद्द

बुलढाणा न्यूज – जिल्हा रूग्णालयात नियमितपणे दिव्यांग तपासणी शिबीर घेण्यात येते. मात्र शुक्रवार, दि. 29 सप्टेंबर 2023 रोजी तपासणीच्या दिवशी स्थानिक सुट्टी असल्यामुळे शिबीर रद्द करण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयात नियमित शुक्रवारी मतिमंद, मनोरूग्ण, कान, नाक, घसा व नेत्र संबंधित दिव्यांग बोर्ड सुरू असते. मात्र शुक्रवार, दि. 29 सप्टेंबर 2023 रोजी ईद-ए-मिलाद निमित्त शासकीय सुट्टी असल्यामुळे या दिवशीचे दिव्यांग तपासणी शिबीर रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी अस्थीव्यंग तपासणीसाठी येऊ नये, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी केले आहे.

सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन

बुलढाणा न्यूज – दर महिन्यात जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार ऑक्टोबर 2023 महिन्याचा लोकशाही दिन मंगळवार, दि. 3 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे.
तक्रारदारांनी लोकशाही दिनी उपस्थित राहावे, उपस्थित राहणे शक्य नसल्यास तक्रारी रजिस्टर पोस्टाने लोकशाही दिनाआधी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचतील अशाप्रकारे पाठवाव्यात, असे निवासी उपजिल्हाधिकारी शरद पाटील यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें