3 ऑक्टोबर रोजी रिपब्लिकन पक्षाचा 67 वा वर्धापन दिन सोहळा

Babasaheb Jadhav buldhana
3 ऑक्टोबर रोजी रिपब्लिकन पक्षाचा 67 वा वर्धापन दिन सोहळा
हैद्राबादमध्ये हजारोच्या संख्येने उपस्थीत राहा – बाबासाहेब जाधव

          बुलढाणा – भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचा 67 वा वर्धापन दिन सोहळा येत्या दि. 3 ऑक्टोबर रोजी तेलंगणा राज्यातील हैद्राबाद मध्ये नामपल्ली रेल्वे स्टेशन जवळील मुकररामजाही रोड वरील एकझही बिशन ग्राउंड वर ना.डॉ.रामदासजी आठवले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे.
          महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्वश्रेष्ठ भारतीय संविधान दिले. त्यांच्या बुद्धीतून महान विचारातून रिपब्लिकन पक्षाची संकल्पना निर्माण झाली. त्यांनी खुले पत्र लिहून रिपब्लिकन पक्षाची संकल्पना घटना लिहिली. त्यानुसार दि.3 ऑक्टोबर 1957 रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची ऐतिहासिक स्थापना झाली. त्यानुसार दरवर्षी रिपब्लिकन पक्षाचा वर्धापन दिन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा भारत सरकारचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांच्या अध्यक्षते खाली साजरा होतो.
         महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला रिपब्लिकन पक्षाचा ऐतिहासिक वारसा रिपाइं आठवले चालवत आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. ज्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन संकल्पनेचा अभिमान आहे.ज्यांचा महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांवर विश्वास आहे, श्रद्धा आहे. ज्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन विचार पटतो त्या सर्वांनी भीमसैनिकांनी रिपब्लिकन पक्षाच्या वर्धापन दिन सोहळ्यास हजारोच्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन बुलडाणा जिल्हा रिपब्लिकन पार्ट्री ऑफ इंडीया आठवलेचे जिल्हा कार्यध्यक्ष तथा पत्रकार बाबासाहेब जाधव यांनी बुलडाणा जिल्ह्यातील रिपाइं जिल्हा कार्यकारणी, तालुका, ग्रामीण, शहरी शाखा, महीला आघाडी, युवा आघाडी , रोजगार आघाडी व पँथर नेते मागासवर्गीयांचे हदय सम्राट रिपाइंचे राष्ट्रीय नेते भारत सरकारचे सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ.रामदासजी आठवले यांचे वर प्रेम करणारांनी या वर्धापन दिनी हजारोच्या संख्येने बुलढाणा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी उपस्थीत राहावे .
         डॉ.बाबासाहेब आंबेडकारांच्या रिपब्लिकन संकल्पनेला आम्ही अंगात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत रिपब्लिकन राहू आम्ही कधीही आमच्या पक्षाचे नाव बदलणार नाही. रिपब्लिकन संकल्पना ही डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची संकल्पना असून रिपब्लिकन पक्षाला रामदास आठवलेंनी देशभर पोहोचवले आहे. नागालँड मध्ये रिपब्लिकन पक्षाचे दोन आमदार निवडून येऊन तिथे रिपाइंचा निळा झेंडा फडकला आहे. लक्षदीप पोंडीचेरी केरळ ते जम्मू काश्मीर पर्यंत देशातील 28 राज्य आणि 8 केंद्र शासित प्रदेशात रिपब्लिकन पक्ष कार्यरत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन वारसा ना.रामदासजी आठवले घेऊन देशभरात गावागावात निळा झेंडा फडकवित आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें