बुलडाणा- जिल्हाधिकारी कार्यालयात आज पंडित दिनदयाल उपाध्याय यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
निवासी जिल्हाधिकारी शरद पाटील यांनी पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, तहसीलदार संजीवनी मोफळे, नाझर गजानन मोतेकर, अवल कारकून शिल्पा पाल आदी उपस्थित होते.