महिनाभरापासून जेवण निकृष्ठ दर्जाचे मिळत असल्याचा मुलींचा आरोप
चिखली (जि.बुलढाणा) : चिखली शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलींचे तथा आर्थिकदृष्ट्या मागास मुलींच्या शासकीय वस्तीगृहामध्ये शुक्रवार, दि.22 सप्टेंबर रोजी रात्रीच्या जेवणामधून 6 मुलींना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. 6 मुलींना अवस्थेत रात्री 2 वाजेच्या सुमारास शहरातील खाजगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले होते.सद्यःस्थितीत त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजतेे. गेल्या महिनाभरापासून जेवण निकृष्ठ दर्जाचे मिळत असल्याची तक्रार या मुलींनी यापुर्वी केली आहे. या घटनेमुळे चिखली शहरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी की, चिखली शहरातील पुंडलींक नगर भागामध्ये मागासवर्गीय मुलींचे तथा आर्थिकदृष्ट्या मागास मुलींच्या शासकीय वसतीगृह आहे. या वस्तीगृहामध्ये एकूण 62 विद्यार्थीनी शिक्षणाकरता राहात. त्यांच्या राहण्याची तसेच जेवणाची व्यवस्था या वसतीगृहामार्फतच करण्यात येते. शुक्रवार, दि.22 सप्टेंबरच्या रात्रीच्या जेवणानंतर या मुली वस्तीगृहामधील आपापल्या खोल्यांमध्ये झोपण्यासाठी गेल्या. मात्र रात्री दोन वाजेव्सर सुमारास एकापाठोपाठ एक अशा एकूण सहा मुलींची प्रकृती बिघडण्यास सुरुवात झाली. सदर बाब मुलींनी तात्काळ गृहपाल व कर्मचार्यांना सांगितली. यावेळी त्यांनी सहा ही मुलींना शहरातीलच खाजगी रुग्णालयामध्ये दाखल केले.
यावेळी उपस्थित डॉक्टरांची मुलींची तपासणी केली असता त्यांना झाल्याचे उघडकीस आले. सद्या या मुलींची प्रकृती स्थिर आहे. या घटनेची माहिती मिळताच सदर विद्यार्थीनींशी संवाद साधला असता हा घडलेला प्रकार आमच्यासोबत गेल्या महिन्याभरापासून सुरू असून आम्ही बाहेर गावावरून शिक्षण घेण्यासाठी चिखली शहरांमध्ये आलो आहोत. आम्ही वारंवार जेवणा संदर्भातली तक्रारी वस्तीगृहांच्या गृहपालाकडे केल्या. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे या मुलींनी सांगितले.