भारतीयात एकसुत्रता निर्माण व्हावी – गणेशोत्सव

भारतीयात एकसुत्रता निर्माण व्हावी – गणेशोत्सव (Unity should be created in India – Ganeshotsav)

पत्रकारितेच्या इतिहासातील प्रखर तेजस्वी सूर्य म्हणून ओळखल्या जाणार्‍या लोकमान्य टिळकांच्या नांवे जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकारांना मिळतो. याचाच अर्थ असा लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रभक्ति, लोकशक्ति आणि अन्याय मुक्तिला वाहिलेल्या ओजस्वी पत्रकारितेचे परंपरा आजही अखंड अविरत चालू आहे असाच होतो.
लोकमान्य टिळक हे ब्रिटिश सरकार बद्दल लोकांच्या मनात असंतोष निर्माण करणारे नेते म्हणून एकीकडे कार्य करीत होते. त्याचवेळी त्यांचा आवडत्या विषयांचा अभ्यासही चालू होता. त्यामुळेच राष्ट्रीय पातळीवर सामाजिक परिस्थितीवर आणि प्रासंगिक घटनांवर केसरी तून लेख करतानांही टिळकांनी आर्याचे वस्तिस्थान ओरायन शास्त्रीय पंचांग गितारहस्य असे ग्रंथ लिहून आपल्या अभ्यासाचा परिचय घडविला. यापुढील काळात सामाजिक सुधारणेच्या प्रश्नावरुन टिळक व आगरकर यांच्यात मतभेद निर्माण झाले. त्यामुळे आगरकारांनी 1887 मध्ये केसरीच्या संपादक पदाचा राजीनामा दिला व टिळकांनी केसरीच्या संपादक पदाची धुरा सांभाळली. समाजातल्या सर्वांना एकत्र आणून व्याख्यानांद्वारा मत प्रचार करण्यासाठी त्यांनी श्रीगणेशोत्सव असे नवे उपक्रम सुरु केले. ते आजतागायत अव्याहतपणे सुरु असलेले दिसतात, लोकमान्य त्यांचे जनक होते.
भारतीय संस्कृतीत प्रत्येक तत्व मनावर ठासविण्यासाठी काही प्रतिके सांगितलेली आहेत. आम्हाला बाप्पा तू सद्सदविवेक बुध्दीचे प्रतिक वाटतोस. चांगल्या वाईटाचा सत्य-असत्याचा, पाप-पुण्याचा निवाडा करण्याची क्षमता देणारा तू देव आहेस. म्हणुनच तुला बुध्दीदाता म्हटले जाते. आज समाजाला या सद्सद्विवेक बुध्दीदात्या श्री गणेशाची पूर्वी कधी नव्हती एवढी आज गरज आहे. कारण आजवर नव्हता एवढा समाज अध:पतनाच्या उंबरठयावर उभा आहे. तुझ्यापुढे उभे राहिल्या वर माणसाच्या मनातल्या सद्भावना, सहानुभुती, सहृदयता, सज्जनता, सद्विचार, समभावना, सहभावना जाग्या होतात आणि तो मी ऐवजी आपण माझे ऐवजी आपले असा विचार करायला आपण प्रवृत्त होतो, हेच तुझे अवतार कार्य आहे.


भारतीय संस्कृतीत मूर्ती पूजाही एक थोर आणि मधुर अशी कल्पना आहे. माणसाला स्वत:चा उतरोत्तर अधिक विकास करुन घेता यावा म्हणुन जी अनेक साधने भारतीय संस्कृतीने निर्माण केली, त्यातील एक आहे मूर्तीपूजा. मनुष्य प्राणी हा जन्मत:च विभूती पूजक आहे. आपल्या पेक्षा जे मोठे आहेत, त्यांचे आपण कौतूक करतो. आपल्याहून जे थोर आहेत बुध्दीने, प्रतिमेने, विचाराने महान आहेत त्यांची पूजा करावी असे माणसाला वाटते. ही पूजा आपण त्यांच्या आदर्शाची करतो, म्हणूनच त्या आदर्शाचे अनुकरण करण्याची प्रेरणा मनाला कार्य प्रवृत्त करते.
बाप्पा ! तुझ्या आगमनानं आज सारं महाराष्ट्र राज्य रोमांचित, हर्ष भरित झालं आहे. खरोखरंच राज्याची काही पुण्याई आहे, म्हणुन संभवामि, युगे-युगे असे म्हणत. हजार पाचशे वर्षातून केव्हा तरी एकदा अवतार घेणारा परमेश्वर, दरवर्षी नित्य-नेमाने तुझ्या रुपाने या राज्यात अवतरतो. तेव्हा गहिवरुन येतं, तुझ्या नुसत्या दर्शनाने पोर्णिमेच्या चंद्राला पाहुन सागराला भरती यावी, तशी जन सागराला उचंबळुन भावनांची भरती येते. तुझ्या नुसत्याना मोच्चाराने जीवनातील दुख: संकटे, विघ्ने, अडचणी, प्रश्न, समस्यायांना सामोरे जाण्याची शक्ति-स्फुर्ती लाभते. तुझ्या नामस्मरणात अपारसाम आहे. भारतीय संस्कृतीचे मांगल्य, तुझ्या मुर्तीत एकवटलेले आहे. उत्तुंग आणि भव्य तुझ्या मुर्तीमध्ये आम्हाला हिमालयाच्या गिरी शिखरावरील शिव, कन्याकुमारीच्या तेजस्विनीचे सौंदर्य आणि वेद-उपनिषद-रामायण-महाभारतातील, सत्याचा म्हणजे सत्य-शिव-सुंदरतेचा प्रत्यय येतो. शिवाची शक्ति, सत्त्याचे सामर्थ्य आणि सौंदर्यातील ममत्व तुझ्या ठायी सामावलेले आहे. म्हणुनच तु भक्तांच्या नवसाला पावतोस, त्यांची मनोकामना पूर्ण करतोस, त्यांच्यावरील संकटाचे निवारण करतोस कारण तू जगज्येठी आहेस, तूच कर्ता-करवीता आहेस.
तुझ्या ठायी, ज्ञान-भक्ति आणि कर्मयांचा हृदय यंगम संगम आहे. तू खरा उदारदाता आहेस, मेघ जसे सारे पाणी देऊन टाकतात, झाडे-फळे देऊन टाकतात, फुले सुगंध देऊन टाकतात, नद्या ओलावा देऊन टाकतात, सुर्य-चंद्रप्रकाश देतात. तूही जो-जो वांछिले, तो तेलाहो म्हणत सार्‍या भक्तांची इच्छापूर्ती करतोस. तू समाजाती लदंभ, आळस, अज्ञान, रुढी, भेद़-भाव, उच्च निंच पणा, वौमनस्य, दारिद्रय, दु:ख, दैन्य, दुबळेपणा, भ्याडपणा दुर व्हावा. यासाठी तुझ्या विचारांचे, प्रेरणांचे अधिष्ठान, ही आजच्या समाजाची गरज आहे.
तुझ्या आगमनाने राज्याचे रुपांतर दहा दिवसांकरीता अक्षरश: तिर्थक्षेत्रात होते, अख्खा महाराष्ट्र ढवळून निघतो. सारेजण धर्म-भाषा, जाती-पंथ प्रदेश असे सारे भेद विसरुन तुझ्या दर्शनाच्या रांगेत भाविक येतो, या एकाच जातीचे असतात. मनाची क्षुद्रता गळून पडलेली असते, जीवनाला सुंदर करणारे आणि मनाला सुखी करणारे असे ते रुप बाप्पा सर्वांच्यापुढे असते. दु:खाचा, समस्या, संकटाचा विसर पडलेला असता. आनंद, उत्साह, चैतन्य यांनी रोम-रोम पुलकित झालेला असतो. एका तेजाची उपासना आपण करीत आहोत, या अनुभवातून सारे गणेश भक्त तुझ्या सानिध्यात आल्यावर जात असतात. तू बुध्दीचा देव आहेस, परमेश्वर म्हणजे ज्ञान अशी आमची भारतीय संस्कृती सांगते. आम्ही सारे आस्तिक आहोत. कारण आमची तुझ्या जागृत अस्तित्वावर श्रध्दा आहेत. पण तुझे सामर्थ्य असे अगाध आहे की, तुझ्या दर्शनाने नास्तिकांचे ही रुपांतर आस्तिकात होईल. पाप्याला आपल्या पापाची लाज वाटेल, भ्रष्टाचा ज्याला शरम वाटेल हा तुझा महिमा आहे, म्हणुन तू आमच्यासाठी वरदान आहेस. जेव्हा आम्ही पाहतो, तेव्हा गणेशोत्सव, सुरु करणार्‍या लोकमान्य टिळकांच्या स्वप्नांची पूर्ती बाप्पा तूझे सेवक, सामाजिक बांधिलकेच्या भूमिकेतून करतांना पाहून आम्हा भक्तांचा हात अधिक देण्यासाठी आणि ऋण फेडण्यासाठी उतावीळ होतो.
अयोग्य कर्मापासून रोखतेही, मूर्तीपूजा हे मानसीक, बौध्दीक विकासाचे साधन हजारो वर्षापासून आहे. म्हणूनच बाप्पा तुझे अस्तित्व चिरंतन आहे. हे ठाऊक असुनही आम्ही गणेश चतुर्थीला तुझी मूर्ती आनंदाने, अभिमानाने मिरवत देहभान विसरुन, गात-नाचत दहा दिवसांकरीता आणतो, आणि प्राणांच्या ज्योती करुन तुझ्या तेजाची आरती करतो. त्यासाठी आम्हाला तू मूर्तीरुपात हवा असतोस. तू विराट विश्वंभर आहेस, पण आम्ही तूझे पाईक आहोत. आमचे सर्व संकटापासुन ती येण्या आधीच रक्षण-निवारण कर आम्हाला सुख-समाधान, मन:शांती, आरोग्य, समृध्दि, समता-बंधुता-न्याय लाभू दे, हीच तुझ्या चरणी प्रार्थना !

प्रविण बागडे, जरीपटका, नागपूर – 14
भ्रमणध्वनी : 9923620919

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें