धोडपचा ‘चंद्रशेखर’ शास्त्रीय ख्याल गायन स्पर्धेत भारतातून तिसरा

सौ.साधना प्रवीण थोरात

धोडप ता.चिखली सारख्या छोट्या गावातील चंद्रशेखर कैलास कोल्हे Chandrashekhar Kailash Kolhe यांने शास्त्रीय ख्याल गायन Classical Khayal singing स्पर्धेत भारतातून तिसरा आला आहे. ही स्पर्धा पुणे येथे आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत त्याने राग मारवा छोटा ख्याल व राग पुरिया हा बडा ख्याल सादर करून त्या दोन्ही रागामध्ये साम्य काय व भेद काय आहे या दोनही विषयाचे समर्पक सादरीकरण करुन व उपस्थितांची मने जिंकली.

भारतातील सर्वात मोठी आनलाईन व ऑफलाईन हिंदूस्थानी शास्रीय ख्याल गायन स्पर्धेत सहभाग घेत चंद्रशेखर कैलास कोल्हे हा या सर्व परिक्षणातुन चंद्रशेखरने तृतीय मिळविले. चंद्रशेखर हा डि वाय पाटील कॉलेज पुणे D Y Patil College Pune येथे इंजिनिअरींगच्या तृतीय वर्षाला शिकत असुन तो संगीत अलंकार गायन प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेला आहे. तसेच तो तबला विशारद देखील आहे.

चंद्रशेखर कोल्हे याला संगीताचे ज्ञान बालपणापासूनच आई-वडिलांकडून मिळाले आहे.वडील. कैलास कोल्हे सर हे सहकार विद्या मंदिर बुलढाणा येथे संगीत शिक्षक असून आई सौ.अनिता कैलास कोल्हे या संगीत विशारद आहे. त्याने मिळवलेल्या या यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें