ऐक्य, बंधुता आणि विकासाचा विचार करणारे कार्यकर्ते आमच्यासाठी संपत्ती – माजी आमदार राहुल बोंद्रे
राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत काँग्रेसमध्ये प्रवेश
जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत याया खान, शेख शाकिर , शेख मोहीन ,शेख वसीम, शेख नासिर, समीर खान,शेख आसिफ, नासिर पटेल, दस्तगीर बागवान,गुलाब शाह,शकील शाह, सादिक शाह, सैयद हादी, अकबर धोबी, आबिद अली खान, असलम अली खान, शेख सद्दाम, शेख फारूक, आरिफ खान खासफ, शेख नदीम, ज़ुबैर शाह, फैयाज खा, शाहीबज खान यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
बुलढाणा न्यूज
चिखली : सामाजिक ऐक्य, बंधुता आणि विकासाचा विचार करणारे कार्यकर्ते आमच्यासाठी संपत्ती आहेत. याया खान यांच्या प्रवेशामुळे काँग्रेस पक्ष अधिक बळकट होईल, असे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांनी सांगितले. काँग्रेस हा विचारांचा पक्ष आहे. समाजातील सर्व घटकांना समान न्याय आणि संधी मिळावी, हीच आमची भूमिका असल्याचे राहुलभाऊ बोंद्रे म्हणाले. चिखली शहरातील याया खान यांनी अखेर भाजपच्या दुटप्पी कारभाराचा, अन्यायाचा आणि भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करत शेकडो कार्यकर्त्यांसह शुक्रवार, १० ऑक्टोबर २०२५ रोजी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
भाजपच्या काळात जनतेच्या विकासाच्या नावाखाली फक्त आश्वासने मिळाली, पण वास्तवात दिसला फक्त भ्रष्टाचार, पक्षपात आणि सामान्य माणसावर अन्याय, असे प्रतिपादन याया खान यांनी करत आम्ही अन्यायाच्या विरोधात सत्याच्या बाजूने आता राहुल बोंद्रेंसोबतच राहणार असल्याचे सांगितले.
याप्रसंगी तालुकाध्यक्ष रामभाऊ जाधव, शहराध्यक्ष राहुल सवडतकर, विष्णू पाटील कुळसुंदर, प्राध्यापक राजू गवई, रिकी काकडे, आसिफ भाई, आमिनखान उस्मानखान,राजू रज्याक,गोपाल देव्ह्डे,मनोज लाहुडकर, डॉक्टर मोहम्मद इसरार, कुणाल बोंद्रे,सचिन बोंद्रे,प्राचार्य निलेश गावंडे सर, नजीर कुरेशी,खलील बागवान, शेख जाकीर, विजय सोनवाल, आबरार बागवान,गणेश ठेंग, दिगंबर देशमाने, खलील गवळी, अज्जू खान, शेख शकील, अप्पू बागवान, शेख सद्दाम, आयान भाई, बाशिद जमदार यांची उपस्थिती होती.
हिरकणी अर्बनला प्रगतीची मोहोर : Hirkani Urban is on the verge of progress
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर संघाची खोचक टीका…