हिरकणी अर्बनला प्रगतीची मोहोर : Hirkani Urban is on the verge of progress

कर्नाटकात होणार दिपस्तंभ पुरस्कार वितरीत; महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेखा लवांडे यांची माहिती

पुरस्काराबद्दल हिरकणी महिला अर्बनच्या अध्यक्षा अ‍ॅड. वृषालीताई बोंद्रे यांनी समाधान व्यक्त करत सांगितले की, हा सन्मान आमच्या सर्व सभासद, कर्मचारी आणि महिलांच्या एकजुटीचा आहे. महिलांच्या आर्थीक सबलीकरणाला प्राधान्य दिले असून यापुढेही महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबध्द राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. या यशात संस्थेचे आधारस्तंभ माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे, सचिव, संचालक मंडळ, विविध शाखांची सल्लागार समिती, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सरव्यवस्थापक, विभागीय अधिकारी, शाखाधिकारी, कर्मचारी वृंद यांच्यासह संस्थेचा ग्राहक वर्ग, सभासद यांचे महत्वाचे योगदान असल्याचे अ‍ॅड. वृषालीताई बोंद्रे यांनी सांगितले.

चिखली : आपल्या कार्यकुशलतेचा, पारदर्शक व्यवस्थापनाचा आणि महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा हिरकणी महिला अर्बनला आणखी प्रगतीची मोहोर लागली आहे. येत्या १२ व १३ ऑक्टोबर रोजी डेनिसन्स रिसार्ट कुमटा कर्नाटक येथील पुरस्कार वितरण सोहळ्यात संस्थेचा दिपस्तंभ पुरस्काराने सम्मान होणार आहे. या पुरस्काराद्वारे संस्थेच्या सातत्यपूर्ण प्रगतीचा, सामाजिक बांधिलकीचा आणि महिला सक्षमीकरणासाठी घेतलेल्या उपक्रमांचा गौरव करण्यात आला आहे. संस्थेच्या अध्यक्षा अ‍ॅड.वृषाली राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वाखाली संस्थेने अल्पावधीतच आर्थिक स्थैर्य, ग्राहकांचा विश्वास आणि महिला सदस्यांच्या सर्वांगीण विकासाचे भक्कम उदाहरण उभे केले आहे.

याबद्दल सन २०२३- २४ च्या दिपस्तंभ पुरस्कारानेही संस्थेचा सन्मान झाल्याने सलग दुसर्‍यांदा हिरकणी महिला अर्बनने पुरस्कारावर मोहोर उमटवली आहे. हिरकणी महिला अर्बनने महाराष्ट्रातील पतसंस्था चळवळीत दिपस्तंभाप्रमाणे कार्य करुन पतसंस्था चळवळीला मार्गदर्शक दिशा दर्शविली आहे. संस्थेच्या कार्याबद्दल अमरावती विभाग या गटामधून मानाच्या दिपस्तंभ पुरस्काराने हिरकणी महिला अर्बनला गौरविण्यात येत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सहकरी पतसंस्था फेडरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. सुरेखा लवांडे यांनी दिली.

हिरकणी महिला अर्बनचा चढता आलेख असा

  • हिरकणी महिला अर्बनच्या २० शाख असून आज रोजी १०८ कोटींचा टप्पा गाठलेला आहे.यामध्ये ७२ कोटींचे कर्जवाटप केले आहे.
  • संस्थेकडे ५ कोटी ३६ लाख अचल मालमत्ता
  • मागील वर्षाच्या तुलनेत नफ्यात दुप्पटीने वाढ झाली.( नफा १ कोटी ४४ लाख रुपये)श्संस्थेचे एकूण उत्पन्न १४ कोटी ९६ लाख रुपये
  • भागभांडवल इमारत निधी व इतर निधी मिळून ५ कोटी ३६ लाख रुपये
  • बुलढाणा जिल्हात ३५० सल्लागार,
  • ९७ कर्मचारी 
  • ५७ अल्पबचत प्रतिनिधी
  • २० शाखांद्वारे पारदर्शक ग्राहकसेवा देत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें