मुंबई – अभिनेता अक्षय कुमारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत नुकतीच घेतली आहे. या मुलाखतीमध्ये अक्षयने मुख्यमंत्री फडणवीस यांनी आयुष्यातील अनेक पैलू उलगडण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर राजकारण, समाजकारण यासह विविध विषयांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलते केले. या मुलाखतीमध्ये अक्षयकुमारने केवळ राजकीय आणि आर्थिक मुद्द्यांवरच नाही, तर पोलिस दलाशी संबंधित महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयांना देखील हात घातला. याच बरोबर अक्षय कुमारने पोलिसांचे पायातील शूजमध्ये बदल करण्यास सुचवले आहे. त्याला मुख्यमंत्री फडणवीस यांनी दुजोरा दिला आहे.
यावेळी अभिनेता अक्षय कुमार याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांच्या गणवेशातील एक त्रुटी दाखवून दिली. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ ती सूचना मान्य करत सकारात्मक पाऊल उचलणार असल्याचे सांगितले. अभिनेता अक्षय कुमारने घेतलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुलाखतीमध्ये पोलिसांच्या गणवेशावरुन चर्चा झाली. यावेळी अक्षय कुमारने पोलिसांचे पायातील शूजमध्ये बदल करण्यास सुचवले आहे. अभिनेता अक्षय कुमार म्हणाला की, पोलिसांच्या बुटांमुळे त्यांना धावताना अडचणी येतात. पोलीस जे बूट वापरतात, त्याचे हिल्स (टाचा) असते, त्यामुळे धावणे कठिण होतं. मी स्पोर्ट्समन असल्याने मला वाटतं, जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर पोलीस जेव्हा धावतात, तेव्हा त्यांच्या पाठीला काहीना काही अडचणी येतात. त्यांचे बूट बदलले, तर त्याचा पोलिसांना उपयोग होईल. ते अधिक धावू शकतील, असा मुद्दा अभिनेता अक्षय कुममारने मुलाखतीदरम्यान, उपस्थित केला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर अभिनेता अक्षय कुमारने हा मुद्दा उपस्थित केला. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी देखील अक्षय कुमारच्या सूचवलेल्या मुद्द्यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिली. या मागणीवर देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ सहमती असल्याचे सांगितले. तुम्ही चांगली गोष्ट सांगितली. आतापर्यंत कुणीही गोष्ट लक्षात आणून दिली नाही. पोलीस हेच बूट घालून कवायत करतात, असे देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी ही बाब लक्षात आणून दिल्याबद्दल अभिनेता अक्षय कुमारचे कौतुक केले.