शंभर वर्षांपूर्वी युनिव्हर्सिटी ऑफ एडीनबर्गमध्ये शिकले होते भारताचे पहिले कृषिमंत्री भाऊसाहेब पंजाबराव देशमुख
साधना प्रवीण थोरात / बुलढाणा न्यूज
वैभव सांगातो मी श्री शिवाजी शिक्षण संस्थाच्या विद्यालयात शिक्षण घेतले, त्या संस्थेचे संस्थापक आणि भारताचे पहिले कृषिमंत्री भाऊसाहेब पंजाबराव देशमुख हे देखील १०० वर्षांपूर्वी याच युनिव्हर्सिटी ऑफ एडीनबर्गमध्ये शिकले असल्याने त्यांच्या प्रेरणेनेच शैक्षणिक वाटचाल सुरु असल्याचे वैभव यांने सांगितले.
वैभव खोडके याने सांगितले की, आईवडीलांनी प्रचंड कष्ट करुन नेहमीच शिक्षणासाठी प्रोत्साहन देत आहेत. पुढील शिक्षण जागतिक युध्द- संघर्ष, सुरक्षा आणि विकास या विषयात घेण्याचे स्वप्न होते. ते पूर्ण झाल्याने स्वप्नपूर्तीचा आनंद अनुभवता आला. या विद्यापीठाचा समृद्ध शैक्षणिक वारसा जगभर प्रसिद्ध आहे. चार्ल्स डार्विन सारखे विद्वान येथे शिकलेले असल्यामुळे युनिव्हर्सिटी ऑफ एडीनबर्गमध्ये पोहचल्याने वैभव या युवकाला युनिव्हर्सिटी ऑफ एडीनबर्गमध्ये प्रवेश मिळाला आहे. जागतिक कीर्तीच्या विद्यापीठात युध्द- संघर्ष, सुरक्षा आणि विकासाचे धडे या विषयात तो पदव्यूत्तर पदवीचे शिक्षण घेत आहे. त्याच्या निवडीने बुलढाण्या जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला.
पुढे बोलतांना वैभव याने सांगितले की, स्पर्धाही तेवढी अटीतटीची असते. मात्र अभ्यासात सातत्य, प्रचंड जिद्द, चिकीटी या त्रिसूत्रीच्या भरवश्यावर केळवद येथील वैभव वैजीनाथ खोडके हे यश मिळाले असल्याचे सांगितले. शेतकरी कुटुंबामधून आलेल्या वैभव खोडकेचे प्राथमिक शिक्षण पहिली ते पाचवी हे केळवद येथील जिल्हा परिषद शाळेत त्यांनतर पुढील शिक्षण ६ ते १२ वीचे शिक्षण बुलढाणा येथील शिवाजी विद्यालयात झाले तर फर्ग्युसन महाविद्यालय येथून त्याने बी.एसीची पदवी संपादन केली आहे.
काय आहे युनिव्हर्सिटी ऑफ एडीनबर्गचे वैशिष्ट
जगातील ५० विद्यापीठांपैकी एक असलेल्या युनिव्हर्सिटी ऑफ एडीनबर्ग या प्रतिष्ठित विद्यापीठात वैभव खोडके आता जागतिक युध्द- संघर्ष, सुरक्षा आणि विकास या अभ्यासक्रमाचा सखोल अभ्यास करीत आहे.
वैभव घेणार राज्य शासनाची ही सुविधा
वैभव खोडके हा युवक या अभ्यासासाठी राज्य शासनाची महाराष्ट्र परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. ही शिष्यवृत्ती त्याच्या शिक्षणाचा शंभर टक्के खर्च उचलणार असून, तिची एकूण रक्कम सुमारे ६० लाख रुपये आहे. वैभव घोडके याने पुढे पीएचडीचे शिक्षण सुरू ठेवले तर ही शिष्यवृत्ती ३ वर्षांत १.५ कोटी रुपये इतकी होणार असल्याचे देखील त्याने सांगितले.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर संघाची खोचक टीका…
Buldhana News पुरग्रस्तांसाठी श्री गजानन महाराज संस्थान सरसावले…
अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाचे किरण सरनाईक यांचा कार्यकाळ डिसेंबर २०२६ मध्ये संपणार