आठ दिवसांच्या आत पैसे जमा न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन
आंदोलनाला विविध पक्ष व संघटनांचा पाठिंबा
या आंदोलनास क्रांतिकारी शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार जनशक्ती पक्ष , राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही सहभाग घेतला. हाजी रशीद खान जमादार, अॅड. साहेबराव मोरे, मंगलाताई पाटील, संदीप बहुरूपे, अजय टप, निलेश नारखेडे यांच्यासह अनेकांनी सरकारने शेतकर्यांना न्याय द्यावा, अशी मागणी केली. तसेच शेतकर्यांच्या खात्यात पीक विमा जमा करण्याची मागणी कृषी अधिकार्यांना केली.
बुलढाणा न्यूज
मलकापूर : तालुक्यातील पात्र शेतकर्यांना पीक विम्याचे पैसे अद्यापही न मिळाल्याने बुलडाणा जिल्हा किसान काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत शहरात गोधडी मुक्काम आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष संभाजी शिरके यांनी केले. या आंदोलनाची सुरुवात शहरातील पंचमुखी हनुमान मंदिरापासून रॅलीने झाली.
घोषणाबाजी करत रॅली कृषी अधिकारी कार्यालयावर पोहोचली. शेतकर्यांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत आम्ही येथून उठणार नाही, अशी भूमिका घेत शेतकर्यांनी रात्रभर कार्यालयात मुक्काम ठोकला. आंदोलना दरम्यान शेतकर्यांनी जोरदार घोषणा दिल्या. सायंकाळी टाळ-मृदंगाच्या गजरात भजन घेऊन शेतकर्यांनी शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
आंदोलनस्थळी सोपानराव शेलकर, राजू पाटील, अनिल भारंबे, रईस जमादार, बंडू चौधरी, गिरीश देशमुख, ज्ञानेश्वर डांबरे, किसान काँग्रेस तालुकाध्यक्ष राजू जवरे, विष्णू क्षीरसागर, अनिल मुंधोकार, अतुल खोडके, शेख अयुब जमादार, शे.कलीम, इमरान जमदार, डॉ.राजेंद्र राऊत, गोविंदराव रहाटे, फिरोज खान, अनिल बगाडे, अॅड. सम्यक चवरे, अशोकराव मराठे, कल्पना पाटील, अशोक जाजू, नंदकि शोर धोरण, कैलास ताठे, गजानन भारंबे, शेख सादिक, गोपाल रायपूरे, निलेश झांबरे, दामोदर शर्मा , रणजीत डोसे, बाळूभाऊ ठाकरे, चक्रधर बावस्कर, गोपाल सातव, अमोल राऊत, सचिन शिंगोटे, श्रीकृष्ण भगत, बळीराम बावस्कर या पदाधिकार्यांसह रामचंद्र बोराडे, सुभाष खर्चे, नंदकि शोर देशमुख, जगन्नाथ मालठाणे, प्रकाश म्है सागर, गणेश लांडे,
हरिभाऊ म्हैसागर, श्रीकृष्ण म्हैसगार, भास्कर मालठाने, प्रभाकर मालठाणे, रघुनाथ वैतकार, गजानन आढाव बाजीराव खोडके, ज्ञानेश्वर खराडे, गोपाल कावस्कर, निवृत्ती वाघोदे, श्रीधर गारमोडे, अनि ल घाटे, गोपाल घाटे, श्यामसिंग गोट, मारुती आमले, नीलकंठ मालठाने, बळीराम मालठाने, प्रेमनाथ मुकुंद, सुरेश गारमोडे, सुधाकर तायडे, जगदीश कोलते, संजय महल्ले, सारंगधर काळे, करीम खान, अरुण अनवेकर, घनश्याम तायडे, सुनील पाटील, शिवजी तायडे, रामदास तायडे, अरुणराव तायडे, कमलेश तायडे, रोशन देशमुख, बादलसिह राजपूत आदी शेतकरी उपस्थित होते.
आंदोलनस्थळी रात्री उशिरा काँग्रेसचे नेते श्यामकुमार राठी, किसान काँग्रेस प्रदेश सचिव जाबीर भाई, अॅड. जावेद कुरेशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन जगताप, अजम कुरेशी, आकाश भोईटे, समीर खान यांनी भेट देऊन शेतकर्यांच्या लढ्याला पाठिंबा दर्शवला. या आंदोलनानंतर तालुका कृषी अधिकार्यांनी वरिष्ठां शी संर्पक साधला. आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी चर्चा केल्यानंतर यावर त्वरित कारवाई करत जि ल्हा कृषी अधिकार्यांनी पीक विमा कंपनीला लवकरात लवकर शेतकर्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याकरिता पत्र लि हून कळवले. त्या अनुषंगाने तहसीलदार तसेच तालुका कृषी अधिकार्यांनी संभाजी शिर्के यांना पत्र दिले. आम्ही वरिष्ठांशी या विषयावर चर्चा केली असून, लवकरात लवकर शेतकर्यांच्या खात्यात पैसे जमा होतील, असे पद्धतीच्या आश्वासन देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. यावेळी आठ दिवसांच्या आत पैसे जमा न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देऊन शेतकर्यांनी आंदोलन तूर्त स्थगित केले.