बुलढाणा न्यूज
मागील १५ दिवसापासून सेवेत कायम स्वरुपी समायोजन करण्यात यावे. या प्रमुख मागणीला घेऊन जिल्ह्यातील कंत्राटी अधिकारी आणि कर्मचारी हे आंदोलन करित आहेत.
या आंदोलनाची राज्य शासनाने तातडीने दखल घेऊन त्यांना सेवेत कायम करावे. यासाठी आज गुरुवार, दि.४ सप्टेंबर २०२५ रोजी सीटूच्या वतीने संघटनेचे जिल्हाध्यक्ष कॉ.पंजाबराव गायकवाड यांनी जिल्हाधिकारी श्री.किरण पाटील यांना निवेदन दिले.
सदर निवेदन हे आरोग्य व कुटुब कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य यांना पाठविण्यात आले. सरकारने या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन सदरहू कंत्राटी कर्मचार्यांना न्याय द्यावा, अन्यथा सीटू या कंत्राटी कर्मचार्यांच्या आंदोलनात बुलढाणा जिल्ह्यातील सर्व कर्मचारी शक्तीनिशी सहभागी होतील, असा इशारा यावेळी सीटूचे जिल्हा अध्यक्ष कॉ.पंजाबराव गायकवाड यांनी पाठिंबा देताना सरकारला दिला. यावेळी निवेदन देताना संघरत्न साळवे, मनिषा बोराडे,मेघा पारस्कर, दत्तात्रय गायकवाड,गौरव वानखेडे,स्वाती गावंडे इत्यादी उपस्थित होते.