बुलढाणा न्यूज
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मेहकर, जि. बुलडाणा येथे विविध पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवारांनी दि. ८ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १२.३० वाजेपर्यंत आयटीआय मेहकर येथे मुळ कागदपत्रांसह प्रत्यक्ष मुलाखतीसाठी हजर राहावे, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य व्ही.बी. शिरसाट यांनी केले आहे.
सोलर टेक्निशियनचे(इलेक्ट्रीकल) २ पदे(ठोक मासिक वेतन), जोडारीचे १ पद(तासिका तत्वावर), इम्प्लॉयबिलिटी स्कील/कॉम्प्युटर ऑपरेटर १ पद (तासिका तत्वावर), मेकॅनिक इलेक्ट्रीक व्हेईकल १ पद(ठोक मासिक वेतन). सर्व पदांसाठी छडटऋ लेव्हलनुसार ट्रेड सिलेबसप्रमाणे पात्रता आवश्यक आहे. तसेच किमान एक वर्षाचा अनुभव असणे बंधनकारक आहे.
याआधी सदर पदांसाठी मुलाखत दिलेल्या उमेदवारांनी अर्ज करु नये. असे अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही, यांची नोंद घ्यावी. तासिका व मासिक वेतन हे डिजिइटीच्या मानदंडानुसार देण्यात येईल. निवड प्रक्रियेबाबतचे सर्व अधिकार हे प्राचार्य, आयटीआय मेहकर यांचेकडे राहतील.