रक्तदान शिबिरास मृत्युंजय संजय गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती लाभली
बुलढाणा न्यूज
येथील चांडक ले आऊट परिसरात एकदंत मित्र मंडळाच्या वतीने यांच्या विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याचा एक भाग म्हणून रविवार, दि.३१/०८/२०२५ रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.शिबिरामध्ये एकूण ५१ युवकांनी रक्तदान केले.
यावेळी बुलढाण्याचे कार्यतत्पर आमदार संजुभाऊ गायकवाड यांचे चिरंजीव मृत्युंजय संजय गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच सुंदरखेड ग्रामपंचायतचे उपसरपंच निलेश राठोड हे सुद्धा उपस्थित होते. यावेळी सुंदरखेडचे ग्रामपंचायत सदस्य कमलेश चंदन, विनोद तळेकर, मधुकर पवार आणि एकदंत मित्र मंडळाचे अध्यक्ष तुषार भागवत, उपाध्यक्ष वैभव आवलेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मंडळातील सदस्य सावन परिहार, आकाश खडके, रोहित हिवाळे, प्रज्वल साखरे, पियूश चंदन, अजय जाधव, ओम शेळके, ओम नागपुरे, ऋषी उगले, प्रज्वल गीते, मयूर नागरे, विठ्ठल सणासे, अमित शेळके यांनी उपस्थित होते.
तसेच मंडळामार्फत गरजूंना फळ वाटप करुन मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणााचे आयोजन करण्यात आले होते.