Bapumiya Sirajuddin Patel Arts Commerce Science College Pimpalgaon Kale
बुलढाणा – बापूमिया सिराजोद्दीन पटेल कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पिंपळगाव काळे येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड सलीम पटेल उपाध्यक्ष प्रा कय्यूम पटेल सहसचिव रब्बानी देशमुख संचालक सिराजोद्दीन पटेल प्राचार्य डॉ शेख फराह यांच्या मार्गदर्शनाखाली हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती राष्ट्रीय खेळ दिवस म्हणून साजरी केली.
29 ऑगस्ट राष्ट्रीय खेळ दिवसानिमित्त महाविद्यालयाने दिवसभर सर्व मुला मुलींचे संघ तयार करून कबड्डी हा खेळ दिवसभर खेळविला. महाविद्यालयातील प्रत्येक प्राध्यापकांनी एक एक संघाची निवड करून मुला मुलींचे संघ तयार केले. या संघामध्ये चुरशीची लढत झाली. विजेता संघाला पारितोषिक देण्यात आले. आपला संघ जिंकवण्यासाठी प्राध्यापकांमध्ये सुद्धा चुरशीची लढत दिसून आली.
राष्ट्रीय खेळ दिवसा निमित्त प्रत्येक विद्यार्थ्याने मैदानावर खेळले पाहिजेत हाच एक उद्देश होता आणि तो यशस्वी झाला. हेच अभिवादन हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद Major Dhyan Chand, the magician of hockey यांना होते. या स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड सलीम पटेल साहेब यांनी केले व त्यांनी आपल्या भाषणामध्ये जो विद्यार्थी मैदानावर खेळेल तोच आपले आरोग्य टिकवून ठेवेल असे बोलून विद्यार्थ्यांना आरोग्याबद्दल मार्गदर्शन केले.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा महेश नेतनस्कर, डॉ निखिल अग्रवाल, डॉ चेतन पलन, डॉ नूर मोहम्मद ,डॉ काजी अझरुद्दीन,डॉ दीपाली सिरसाट, डॉ आनंद जाधव,प्रा मनोहर जांभळे,प्रा नितीन असोले, प्रा शकील खान,प्रा प्राजक्ता बाठे, प्रा मोहम्मद शोएब विशेष सहकार्य श्री अजित तडवी प्रा जितेंद्र कचवे, सिंधू राऊत गजानन इंगळे,गजानन भोपळे, परेश अवचार,अफरोज सय्यद, अमोल देवकर, विशाल दाणे, सागर खांदे,सागर बहादरे,अक्षय तायडे,साजिद देशमुख, आशिष इंगळे,जुबेर खान, शेख जुबेर,वसीम देशमुख वैभव ताठे, हिरामण कोळपे शिक्षक व शिक्षेकत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले सूत्रसंचालन शारीरिक शिक्षण संचालक डॉ बाबाराव सांगळे यांनी केले.