To maintain law and order, celebrate all religious festivals with Gunya Govinda – District Superintendent of Police Nilesh Tambe
देऊळगाव राजा- देऊळगाव राजा उपविभागात चार पोलीस स्टेशन येतात यामध्ये किनगाव राजा, सिंदखेडराजा, देऊळगाव राजा व अंढेरा यांचा समावेश आहे आगामी काळात पोळा सन,श्री गणेशोत्सव, महालक्ष्मी उत्सव, मोहरम उत्सव, असे खूप धार्मिक सण साजरे होणार आहेत हे सर्व सण सामंजस्याने व एकोप्याने साजरे व्हावेत यासाठी पोलीस प्रशासन आपल्या परीने प्रयत्न करत असून शांतता समिती सदस्य व विविध गणेश मंडळाचे सदस्य यांनी यामध्ये पुढाकार घेत पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून कुठेही कोणत्याही उत्सवाला गालबोट लागणार नाही याची दक्षता घेण्याचे आव्हान दिनांक 21 ऑगस्ट 2025 रोजी नप च्या सभागृहात पोलीस उपविभागाच्या वतिने आयोजित शांतता समितीच्या सभेत जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी केले.
याबाबत सविस्तर असे की आगामी काळात हिंदू व मुस्लिम समाजाचे सण येत आहेत व सर्व धर्म समभावाचे प्रतीक असलेल्या श्री बालाजी महाराजांच्या या पुण्यनगरीमध्ये आतापर्यंत अनेक वर्षांचा इतिहास सांगतो की या नगरीत सर्व समाजाचे सर्व धार्मिक उत्सव एकोप्याने व मोठ्या उत्साहात एकमेकांना सहकार्य करत साजरे होतात या वर्षी सुद्धा हे सर्वच धार्मिक उत्सव एकोप्याने व कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी दिनांक 21 रोजी शांतता समितीच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेत जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम, दे राजा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ब्रह्म गिरी, तहसीलदार वैशाली डोंगरजाळ, मुख्याधिकारी अरुण मोकळ, व चारही पोलीस स्टेशनचे पोलीस प्रमुख उपस्थित होते यावेळी उपस्थिताना मार्गदर्शन करताना जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी सांगितले की जुन्या काळात जसे पारंपारिक वाद्य वाजवून श्री गणेशाचे आगमन व निरोप देण्यात येत होता.
त्याचप्रमाणे आता DJ चा आग्रह न धरता पारंपारिक वाद्य वाजवून सर्व उत्सव साजरे करावे DJ चे फार दुष्परिणाम असून अनेक वेळा याच्या आवाजाने जीवित हानी झालेली असून त्याच्या एलईडी लाईट मुळे अनेकांना कायम स्वरुपी अंधत्व आलेले आहे सर्वांनी पोलीस प्रशासन व इतर यंत्रणा प्रमुखांना वेळोवेळी सहकार्य करावे कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये असे आढळल्यास संबंधिताविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला व विज वितरण कंपनीने विसर्जन मिरवणूक मार्गावर कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याचे सुचविले व नगर परिषद प्रशासनाने या मार्गावरील खड्डे असतील किंवा कोणाचे बांधकाम साहित्य असेल तर ते वेळे पूर्वीच उचलून घेणे बाबत कार्यवाही करण्याचा सुचना दिल्या. सूत्र संचलन व आभार पोलिस निरीक्षक ब्रह्म गिरी यांनी मानले, या सभेला सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते , विविध गणेश मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते,