विद्यार्थ्यांनो, उद्योजक होण्याचे ध्येय ठेवा : सैफूल्लाह खान 

 

बुलढाणा 
उद्योग कशाला म्हणावे तर एखाद्या छोट्या गाडीवरती केळी विकणे फूड्स विकणे यालाच उद्योग म्हणतात, ही झाली उद्योगाची व्याख्या.
विद्यार्थ्यांनी उद्योग करण्यासाठी लाजू नये, मग तो कोणताही उद्योग असो, छोट्या उद्योगातूनच तुम्हाला अनुभव मिळतो. या अनुभवातूनच तुम्हाला मोठे उद्योग करण्याचे प्रशिक्षण मिळत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे उद्योजक होण्याचे ध्येय ठेवा, असे आवाहन मंबईचे उद्योजक सैफूल्लाह खान यांनी केले.

बापूमिया सिराजोद्दीन पटेल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पिंपळगाव काळे येथे मुंबई येथील उद्योजक डॉ. सैफूल्लाह खान यांचा महाविद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना उद्योजकता यांचे महत्त्व कळावे व छोट्याातील छोटा उद्योग कसा करावा याची प्रेरणा विद्यार्थ्यांना मिळावी म्हणून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. सलीम पटेल यांनी डॉ. सैफऊल्ला खान यांना निमंत्रित केले.
या ग्रामीण भागात चालणाऱ्या महाविद्यालयामध्ये तुम्ही इथे शिक्षण घेऊन या शिक्षणासोबत उद्योगाची जोड देऊन निश्चितच तुम्ही यशस्वी व्हाल, अशी अपेक्षा त्यांनी केली. या परिसरातील विद्यार्थी भाग्यवान आहे की, त्यांना येथे केजी ते पीजी पर्यंत शिक्षण उपलब्ध आहे. उद्योग करण्यासाठी शिक्षण हे फार महत्त्वाचे आहे. उद्योगासोबत शिक्षणाची जोड नसेल तर उद्योग यशस्वी होण्याची संभावना कमी असते, असे मत खान यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला प्रामुख्याने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. सलीम पटेल, संस्थेचे संचालक सिराजोद्दीन पटेल, प्राचार्य डॉ. फराह शेख, इमरान खान, जुनेद खान, अनस खान आदी उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एम. बी. इंगळे तर आभार प्रदर्शन प्रा. एम. डी. नेतनस्कर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें