बुलढाणा न्यूज टिम
डिजिटल तंत्रज्ञान आणि कृषी-नवोपक्रम क्षेत्रात कार्बन तटस्थता आणि पर्यावरणीय पुनरुत्पादनसाठी सर्वोत्कृष्ट पोस्टर पुरस्काराने बुलढाणा येथील कॉग्रेसचे माजी नगरसेवक अनिल वारे यांचे सुपूत्र अजित अनिल वारे व मित भावसार यांना सन्मानित करण्यात आले.
सशक्त युवक-समृद्ध शेती : कौशल्य, नवोपक्रम आणि उद्योजकता या विषयावरील ९ व्या राष्ट्रीय कृषी गृष्टी-२०२५ अधिवेशनात बुलढाण्यातील अजित वारे आणि त्याचा जुनिअर मित भावसार इंदोर यांना पुन्हा एकदा (प्रथम क्रमांक) सर्वोत्कृष्ट असा पोस्टर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
शनिवार, दि.२६ व २७ जुलै २०२५ दरम्यान आयसीएआर, नवी दिल्ली येथे भोपाळ येथील विधान कल्याण न्यास यांनी आयोजित केला होता. त्यात डिजिटल तंत्रज्ञान आणि कृषी-नवोपक्रम क्षेत्रात कार्बन तटस्थता आणि पर्यावरणीय पुनरुत्पादनसाठी अजित अनिल वारे व मित भावसार यांना सर्वोत्कृष्टतेचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यामुळे मित्र परिवाराकडून कौतुक केल्या जात आहे.