BJP District President M.A. Vijayraj Shinde announced the Jumbo BJP District Executive.
जिल्हा कार्यकारिणीत नऊ जिल्हा उपाध्यक्ष, चार जिल्हा सरचिटणीस, नऊ जिल्हा सचिव, एक जिल्हा कोषाध्यक्ष, एक जिल्हा प्रसिद्धी प्रमुख तर पाच मोर्चा आघाडी जिल्हाध्यक्ष यांचा समावेश
बुलढाणा: भारतीय जनता पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात संघटनात्मक बदल करण्यास सुरुवात केली आहे. पक्षाने दांडगा जनसंपर्क व गल्लीपासून दिल्ली पर्यंत प्रशासनावर व संघटनेवर जबर पकड असलेल्या बुलढाण्याचे तीन वेळा आमदार राहीलेले मा.आमदार विजयराज शिंदे यांची भाजपच्या संघटनात्मक बुलढाणा जिल्हाध्यक्ष पदी निवड केल्या नंतर विजयराज शिंदे यांनी सुद्धा पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी जिल्हा पिंजून काढण्यास सुरवात केली आहे. पंधरा मंडळ अध्यक्षांच्या निवडीनंतर आज दि. २४ जुलै २०२५ रोजी जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी भाजपा प्रदेशाच्या मान्यतेने संपूर्ण जिल्हाचा राजकीय व संघटनात्मक अभ्यास करून सर्वसमावेशक जंबो जिल्हा कार्यकारिणीची घोषणा केली आहे. जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे हे नवे शिलेदार आता पक्ष संघटनेची जबाबदारी सांभाळणार आहे.
या जिल्हा कार्यकारिणीत जिल्हाध्यक्ष मा.आ.विजयराज शिंदे यांच्यासह नऊ जिल्हा उपाध्यक्ष यामध्ये सर्व श्री गजानन कडूबा घुले, श्री उदय भास्करराव देशपांडे, सौ विजयाताई राठी , श्री गजानन सुखदेव घोंगडे,श्री देविदास तुकाराम जाधव, श्री चंद्रकांत बर्दे, श्री सुभाषराव घिके, श्री संजय माणिकराव गाडेकर, श्री एकनाथ सिताराम जाधव यांचा समावेश आहे.
तर संघटनात्मक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण असणारे चार जिल्हा सरचिटणीस पदी सर्व श्री दत्ता संतोषराव गवळी पाटील, श्री श्रीराम भगवान मुंढे, श्री पंजाबराव रामराव धनवे, श्री प्रकाश चिंधाजी गवई यांचा समावेश आहे.
एकूण नऊ जिल्हा चिटणीस (सचिव) यामध्ये सर्व डॉ श्री मधुसूदन देवराव सावळे, श्री अशोक काशिनाथ किंहोळकर, श्री विजय मारोती पवार, श्री श्रीकृष्ण नामदेव सपकाळ, श्री डॉ शंकर प्रभाकर तलबे, श्री अनंता शंकर शिंदे, श्री सिद्धार्थ केदार शर्मा , श्री राजेश शिवरतन भुतडा, श्री भगवान रामप्रसाद बेंडवाल यांचा समावेश आहे.
जिल्हाकोषाध्यक्ष पदी चिखली नपा माजी नगराध्यक्ष श्री सुहास श्रीराम शेटे यांची नियुक्ती झाली.
जिल्हा प्रसिद्धी प्रमुख म्हणून पत्रकार श्री नितिन शिरसाठ यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच काही भाजपा मोर्चा व आघाडीचे जिल्हाध्यक्ष यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यात किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष पदी श्री चक्रधर माणिकराव लांडे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष पदी सौ सविता संजय पाटील, युवा मोर्च्या जिल्हाध्यक्ष पदी श्री संतोष रामभाऊ काळे, तर अनुसूचित जमाती मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पदी श्री गजानन जयसिंग सोळंके तर शिक्षक आघाडीच्या जिल्हा संयोजक पदी श्री संदीप उत्तमराव नरोटे यांची निवड करण्यात आली आहे. या नवनियुक्त पदाधिकारी यांची जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे घोषणा करून त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.