विकास, स्थिरता आणि लोकाभिमुख धोरणांमुळे काँग्रेसवर जनतेचा विश्वास – हर्षवर्धन सपकाळ

बुलडाणा – काँग्रेस ही चळवळीची जननी तर राष्ट्रीय स्वातंत्र्याची स्फूर्ती आहे. देशहिताचा विचार करणार्‍या देशभक्तांचा संघटित पुकार हा काँग्रेसचा आरंभ होय. काँग्रेसने उभारलेल्या चळवळीमुळे देशात राष्ट्रीय जागृती झाली आणि त्यातूनच भारत स्वतंत्र झाला. आजतागायत काँग्रेसने कधी विचारधारेशी तत्वांशी प्रतारणा केली नाही. देशात पुन्हा लोकशाही टिकवायची असेल तर काँग्रेच हाच पर्याय आहे. विकास, स्थिरता आणि लोकाभिमुख धोरणांमुळे काँग्रेसवर जनतेचा विश्वास वाढत चालला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी काँग्रेस पक्ष सज्ज झाला आहे, असा निर्धार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला.

सोमवार २१ जुलै रोजी बुलढाणा येथे जिल्हा काँग्रेस कमिटीची महत्वाची बैठक उत्साहात पार पडली. यावेळी हर्षवर्धन सपकाळ बोलत होते. ते म्हणाले की, जनतेचा कल पुन्हा काँग्रेसकडे वळत आहे. लोकसभेत आपल्याला चांगले यश मिळाले असून यापुढील निवडणुकांमध्येही काँग्रेस पक्ष मुसंडी मारणार आहे. विद्यमान परिस्थितीत देशात पुन्हा लोकांचे राज्य आणायचे असेल, तर काँग्रेस पक्ष सत्तेवर आला पाहिजे अशी भावना जनमानसात जोर धरू लागली आहे. सत्तर वर्ष काँग्रेसने काय केले? हा प्रश्न विचारणा-यांना सत्तर वर्ष देशातील त्या- त्या वेळच्या पिढ्यांनी सत्तेपासून दूर का ठेवले? हे आताच्या पिढीला उमजू लागले असल्याचेही सपकाळ यांनी सांगितले.

या बैठकीत निवडणुकांची तयारी, संघटनात्मक मजबुती, स्थानिक प्रश्नांची दिशा आणि प्रचाराचे नियोजन अशा विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली. सर्व पदाधिकार्‍यांनी येणार्‍या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला मोठे यश मिळावे यासाठी एकजूट होऊन काम करण्याचा निर्धार केला. याप्रसंगी भगवान धांडे, राजेश मापारी, देवानंद पवार, अतरोधीन काजी, अविनाश उमरकर, भाऊराव भालेराव, कैलास देशमुख, रामभाऊ जाधव, राहुल सवडतकर, निना इंगळे, ज्ञानेश्वर शेजोळ, अनिल भारंबे, रामदास डोईफोडे, आतिष कासारे, बंडू चौधरी, समाधान सुपेकर, सुनिल तायडे, तेंजद्रसिह चौव्हाण, पंकज हजारी, राजू वानखेडे, प्रदिप देशमुख, रहेसखा जमदार, राजू पाटील, शेख समेद, आश्रु फुके, किशोर भोसले, सतिष टाकळकर, प्रविण कदम, रहिसखा यांच्यासहअनुभवी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें