Stock of domestic and foreign liquor seized in Lapali; Dhamangaon Badhe police take action
लपाली येथे देशी-विदेशी दारूचा साठा जप्त; धामणगाव बढे पोलिसांची कारवाई
धामणगाव बढे: मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे धामणगाव बढे पोलिसांनी मारलेल्या छाप्यामध्ये लपाली येथील एका व्यक्तीकडून देशी-विदेशी कंपनीचे सुमारे 8 हजार 70 रुपयांचा दारू साठा जप्त करण्यात आला आहे. मोहन सुनील मुंढे (वय 45) राहणार लपाली तालुका मोताळा असे आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे 18 जुलै रोजी सायंकाळी ठाणेदार नागेश जायले, पोका नितीन इंगळे, चालक पोहेका राजेंद्र शिंगणे यांनी पंचा समक्ष प्रोव्हीशन रेड करत सदर कारवाई केली असता देशी-विदेशी कंपन्यांचा दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. यामध्ये देशी दारूच्या 82 बाटल्यासह विदेशी दारू चा समावेश आहे. घटनेच्या पुढील तपास पोहेका राजेंद्र राणे करीत आहे